gtag('js', new Date());
पुणे- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी  बहुजन , दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली ,विविध सुधारणा घडवून आणल्या. परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे, अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे, तसेच साहित्य विश्वात उपेक्षित ,दलित ,कष्टकरी समाजाचे दुःख ,वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत  केंद्रीय राज्यमंत्री...
दिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान  जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण...
अहमदनगर (अविनाश कुटे पाटील)-महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या  साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या  त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता...
आजच्या 21 व्या शतकात स्त्रिया देखील पुरुषासोबत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवन शैलीमुळे स्त्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंब आणि व्यवसाय अथवा नोकरीची जबाबदारी पार पाडत असताना आरोग्याची साहजिकच हेळसांड होते. त्यामुळेच त्यांना अल्प वयात उच्च रक्त दाब, मधुमेह, स्थौल्य, थायरॉइड,  मासिक पाळीच्या तक्रारी इ.ना सामोरे जावे लागत आहे. अशाच मासिक...
पुणे- पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी पूजा चव्हाण या 23 वर्षीय  तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. केल्यानंतर 48 तास उलटूनही याबाबत गुन्हा नोंद न झाल्याने सोशल मिडियावर याची चर्चा सुरू झाली. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यांशी संबंध असल्याची चर्चाही सोशल मिडियावर सुरू झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना...
मुंबई -अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी  हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.कपूर कुटुंबीयांना या धक्क्यातून  सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. राजीव कपूर यांच्या निकटवर्तीयांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कपूर हे त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते आणि त्यांच्या मनातील काही गोष्टीबद्दल त्यांच्या अत्यंत निकट असलेल्या काहीजणांकडेच ते व्यक्त व्हायचे.