gtag('js', new Date());
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनापुणे-- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाच आणि प्रमुख मंडळांनी आज  आणखी एक स्त्युत्य निर्णय घेतला. यंदा या मंडळांच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील १२८ वर्षांच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे.मानाच्या पाच आणि प्रमुख गणपती...
पुणे(प्रतिनिधी)---राज्यात कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट शहर म्हणून गणल्या गेलेल्या पुण्यामध्ये एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आलेल्या ‘सिरो सर्व्हे’ करण्यात आला. त्यामध्ये ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे निष्पन्न झाले...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--प्रख्यात शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी दुख:द निधन झाले. कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन नंतर ते न्यू जर्सी येथेच होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या निधनाची वार्ता कळताच संगीतप्रेमींमध्ये शोकाची लाट पसरली.  सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र...
सीआयडी चौकशीची मागणी;अन्यथा नायालयात जाणारपुणे--- राज्यात कोरोना काळात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बदलीच्या कायद्याचा भंग झाला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केला आहे. राज्य सरकारने याबाबत सीआयडी चौकशी करावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल  असा इशारा  पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
पुणे-- पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी हाफकीन जीव औषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Rajesh Deshmukh is the new Collector of Pune अगोदरचे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्या जागेवर डॉ. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली...
मुंबई – विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना थेट बारामतीत आव्हान देणारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर जोरदार टीका झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी असलेले, मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना पक्षाकडून आणखी एक गिफ्ट मिळाले आहे. पडळकर यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.