त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक संपन्न : साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार

पुणे-मुंबई
Spread the love

अहमदनगर (अविनाश कुटे पाटील)-महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे राज्य साखर संघाचे कार्यालयात संपन्न झाली.वेतनवाढीच्या प्रश्नावर साखर कारखाना-कामगार प्रतिनिधींमध्ये सकारत्मक चर्चा होऊन 26 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथे चौथी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीला राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड,कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर,साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून अशोक कारखान्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे,कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे,चंद्रदीप नरके,साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ,बी.बी.ठोंबरे,साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन(इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक,सरचिटणीस नितीन पवार,साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,कार्याध्यक्ष अविनाश आपटे,साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ.सुभाष काकुस्ते,चिटणीस कॉ.आनंद वायकर,अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील,शंकरराव भोसले,सुरेश मोहिते,सदस्य सचिव तथा कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे ऑनलाइन सहभागी झाले होते.


दि.16 डिसेंबर 2020 व 12 जानेवारी 2021 रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या पहिल्या व दुसऱ्या बैठकीत वेतनवाढीवर कोणतीच चर्चा झालेली नाही,त्यामुळे या तिसऱ्या बैठकीकडे राज्यातील साखर कामगारांचे लक्ष लागून होते.या आजच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना 40 टक्के वेतनवाढ देणेची एकमुखी मागणी केली.त्यावर दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधींची मते जाणून घेण्यासाठी वेळ मागितली.त्यावर कामगार संघटनाचे प्रतिनिधींनी कारखानदारांशी चर्चा जरूर करा पण पुढची बैठक तातडीने आठ दिवसातच घ्या अशी मागणी केल्याने त्रिपक्षीय समितीची पुढची बैठक 26 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथे चौथी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *