gtag('js', new Date());
नवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत  राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी घेतली...
ऑनलाइन टीम (वॉशिंग्टन)--पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही अमेरिकास्थित भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. कार्नेगी सेंटर फॉर एंडोमेंट ऑफ पीसने Carnegie Center for Endowment of Peace अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींप्रती अर्ध्याहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांचे मत विभागले गेले असले तरी, मोदी आणि भाजपावरील भारतीयांचा...
औरंगाबाद – भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यावर आणि त्यांच्या महिला सहकारी ईशा झा यांच्यावर वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी त्यांना मारहाण करून...
पुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली.डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’...
पुणे-पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे.  सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील एबीआयएल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी  आलेले सुरक्षा रक्क दिसुन येत आहेत.  फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती.
मुंबई- व्यवसाय विस्तारासाठी गाठीभेटी होणे गरजेचे आहे असा सगळ्यांचा सर्वसाधारण समज होता, पण कोव्हिड१९ पश्चात आता ही मानसिकता बदलली आहे. तुमच्या लहान-मोठ्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्कने ही संधी तुम्हाला अगदी सहजरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसाय विस्तार करणे आता...