पुणेस्थित कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी ठरली सेक्टर ३५ – बांधकामक्षेत्रासाठी साठी एनएबिसीबी मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली तपासणी व प्रमाणन संस्था

CQRA NABCB accreditation
CQRA NABCB accreditation

पुणे(प्रतिनिधी) : पुणेस्थित कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी (सीक्यूआरए) ही संस्था बांधकाम प्रकल्पांसाठी सेक्टर ३५ (क्वांटिटी सर्व्हेइंग आणि बिलिंग ऑडिट्स) या क्षेत्रात नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज (एनएबिसीबी) यांचे मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली तपासणी व प्रमाणन संस्था ठरली आहे. एनएबिसीबी ही संस्था क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची घटक संस्था असून आशिया-पॅसिफिक क्षेत्रात तिच्या मानांकनाला मान्यता आहे.

यासोबतच एनएबिसीबीने सीक्यूआरएचे टाइप ए इन्स्पेक्शन बॉडी या मानांकनाचे २०३० पर्यंत नूतनीकरण केले असून, विद्यमान सेक्टर २८ (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) व्यतिरिक्त सेक्टर १७, १८ आणि १९ यांचाही समावेश करून एनएबिसीबीने सीक्यूआरएच्या  मानांकनाची व्याप्ती वाढविली आहे. देशभरातील ४०० हून अधिक पात्र मूल्यांकनकर्त्यांमुळे  सीक्यूआरए ही आता बांधकाम क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी टाइप ए मान्यताप्राप्त तपासणी व प्रमाणन संस्था बनली आहे.

सन २००४ मध्ये स्थापन झालेल्या सीक्यूआरएची स्थापना बांधकामाच्या गुणवत्तेचे स्वतंत्र, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या दोन दशकांत संस्थेने देशभरातील १५०० हून अधिक निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर गुणवत्ता तपासणी व रेटिंग सेवा दिल्या आहेत.

अधिक वाचा  आरएसएस आणि हिंदुत्व: "भारतात मुस्लिम नसावा असे वाटणारा हिंदू असू शकत नाही" - डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्टीकरण

या यशाबद्दल बोलताना सीक्यूआरएचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कुंटे म्हणाले, “सेक्टर ३५ साठी भारतातील पहिले  एनएबिसीबी मानांकन मिळणे हा केवळ  सीक्यूआरए साठीच नव्हे, तर संपूर्ण बांधकाम उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. कामाचे प्रमाण, बांधकाम साहित्याचा वापर आणि बिलिंग यांची स्वतंत्र पडताळणी केल्यास प्रकल्पांतील खर्चाची गळती मोठ्या प्रमाणात रोखता येते, पारदर्शकता वाढते आणि प्रकल्प मालक, विकासक तसेच वित्तीय संस्थांचा विश्वास अधिक दृढ होतो. विस्तारित मानांकनामुळे बांधकामाच्या गुणवत्तेला अधिक मोजमापयोग्य, वस्तुनिष्ठ आणि उत्तरदायी बनविण्याच्या आमच्या वचनबद्धतेला आणखी बळ मिळाले आहे.”

हे मानांकन अशा वेळी मिळाले आहे, जेव्हा भारतातील बांधकाम क्षेत्राला प्रकल्प खर्चातील वाढीचे मोठे आव्हान आहे. विविध उद्योग अभ्यासांनुसार, देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरासरी १८ ते १९ टक्के खर्चवाढ नोंदवली जाते, तर ४१.६ टक्के प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा उशिरा पूर्ण होतात. तसेच ६७ टक्के उद्योगतज्ज्ञांच्या मते, बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती हे खर्चवाढीचे प्रमुख कारण आहे. केंद्र सरकारची देखेरेख असलेल्या रुपये ४२ लाख कोटी कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे, प्रकल्पांवर होणारा वाढीव खर्च वाचवण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे.

अधिक वाचा  अमिताभ बच्चन यांच्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्हच्या बातम्या खोट्या

या पार्श्वभूमीवर सीक्यूआरएने कन्स्ट्रक्शन कॉस्ट लिकेज अॅशुअरन्स ही स्वतंत्र पडताळणी प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली बिल ऑफ क्वांटिटीज पासून अंतिम बिलापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र तपासणी केली जाते. यामध्ये प्रत्यक्ष कामानुसार प्रमाण पडताळणी, अतिरिक्त व बदललेल्या बाबींची तपासणी, साहित्य वापराचे समेट, साठा पडताळणी आणि स्टोअर तपासणी यांचा समावेश आहे. यामुळे प्रकल्प मालकांना अतिरिक्त बिलिंग रोखणे, साहित्याची नासाडी कमी करणे आणि आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे शक्य होते.

सेक्टर २८ अंतर्गत इमारत बांधकामाव्यतिरिक्त  सीक्यूआरएच्या विस्तारित मानांकनामध्ये सेक्टर १७ (मूलभूत धातू व फॅब्रिकेटेड मेटल उत्पादने), सेक्टर १८ (यंत्रसामग्री व मेकॅनिकल अभियांत्रिकी उत्पादने) आणि सेक्टर १९ (इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उत्पादने) यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध औद्योगिक व अभियांत्रिकी क्षेत्रांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपासणी सेवा पुरविण्याची सीक्यूआरएची क्षमता अधिक व्यापक झाली आहे.

अधिक वाचा  भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात

सीक्यूआरए विषयी – कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी (सीक्यूआरए) ही पुणेस्थित टाइप ए मान्यताप्राप्त तपासणी संस्था असून बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी कार्यरत आहे. २००४ पासून संस्थेने निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील १५०० हून अधिक प्रकल्पांवर स्वतंत्र गुणवत्ता पडताळणी, बिलिंग ऑडिट, मटेरियल रिकन्सिलिएशन आणि बांधकाम आश्वासन सेवा पुरवल्या आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love