gtag('js', new Date());
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
पुणे—केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर केंद्रामध्ये सहकार खाते निर्माण करण्यात आले आहे. त्याचा कारभार  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र हे गावापासून ते शहरापर्यंत सहकाराचे जाळे असलेले राज्य असल्याने आणि अजूनही त्यावर कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने केंद्राच्या या खात्याने  राज्याच्या सहकार क्षेत्रावर काय परिणाम होणार याबाबत उलटसुलट चर्चा...
दैवी देणगी काय असते?? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कविकुलगुरू कालिदास होय.प्राचीन काळात भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या लेखन रुपी फुलांचा सुगंध त्यांनी पसरवला होता. स्वतःच्या आयुष्याबद्दल कुठेही लिखाण त्यांचे दिसून येत नाही, पण त्यांनी साकारलेली कल्पना सृष्टी साऱ्यांनाच मोहून टाकते ,इतकं प्रेम त्यांचं त्यांच्या कलेवर होतं .मेघदूत या त्यांच्या अद्वितीय कलाकृतीतील निसर्गाचं अत्यंत मोहक वर्णन आपल्या...
पुणे - प्रत्येक माणूस आयुष्यात एका संधीच्या शोधात असतो. संकटाला संधी मानत अनेक तरुणांनी कोरोना काळात समर्पण वृत्तीने देशभरातील सेवाकार्यात समिधा अर्पण केल्या. यातून नविन प्रेरणेची ज्योत तेवायला हवी, त्याद्वारे पुढील कार्याला चालना मिळेल, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज 'माणसांची' सत्य घटनांवर आधारित...
वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे आपल्या एका ग्रंथांमध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात,वारकरी संप्रदाय म्हणजेच महाराष्ट्रीय...
प्राचीनतम अशा हिंदू धर्मामध्ये मोक्षप्राप्तीला फार महत्त्व. जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुण्यसंचय करणे, व्रत-वैकल्ये करणे, यज्ञ - याग करणे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वेद - उपनिषदांचे अध्ययन करणे या साऱ्या गोष्टी कराव्या लागत. पण प्रत्यक्षात वर्णाश्रम व्यवस्थेतील पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच वेद-उपनिषदातील वचनांच्या अध्ययन- श्रवणाचा अधिकार. राहिलेल्या वर्णातील व्यक्ती व महिलांना मग मुक्ती मिळणार कशी? ज्यांना हे...
पुणे--नैसर्गिकदृष्ट्या महाराष्ट्राला जी देणगी मिळाली आहे याचा पर्यटन वाढविण्यासाठी कसा उपयोग होऊ शकेल यावर आता विचार व्हायला हवा. नजीकच्या भविष्यात पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देता येऊ शकतो, मात्र त्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयी परदेशी नागरिकांना माहिती मिळण्याबरोबरच राज्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन धोरण असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य...