gtag('js', new Date());
पुणे- केंद्रात जसे एक पप्पू आहे, त्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.शुक्रवारी पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना डबे नाही तर इंजिन बदलण्याची गरज असल्याची टिका केली होती. या पार्श्वभूमीवर...
पुणे—पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (पीडीसीसी) तब्बल 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्याने पीडीसीसी बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल 576 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा...
महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा प्रमुख...
पुणे-कोणत्याही खेळामध्ये खेळाडू बरोबरच प्रशिक्षक, खेळाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी अर्थात पंच हे महत्वपूर्ण भूमिका निभावताना पाहायला मिळतात. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घडविण्याबाबत आपल्याकडे अद्यापही जागरूकता नाही. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देत राष्ट्रीय पातळीवरील ठोस धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या...
पुणे--“भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा (ED) तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी  यांच्या अटकेनंतर ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी...
पुणे— माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ब्लॅकमेल करून जमिनी बळकावणे, धमकावणे, खंडणी मागणे अशा विविध आरोपांखाली ‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी रवींद्र बर्‍हाटे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बर्‍हाटे याच्या सर्व बाजूंनी फास आवळल्यानंतर तो आज स्वत:हून पोलिसांना शरण आला.मागील दीड वर्षात खंडणी प्रकरणी रवींद्र...