gtag('js', new Date());
पिंपरी(प्रतिनिधी)--राज्यातील विविध महामार्गांवर उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांपैकी काही टोलनाके मुदत संपल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. मात्र, या बंद करण्यात आलेल्या  टोलनाक्यांचे सांगाडे तसेच पडून आहेत. त्यामुळे ही ठिकाणे वाहनचालकांसाठी अडथळे ठरत आहेतच; शिवाय हे बंद टोलनाके गुन्हेगारी केंद्रे बनत चालली आहेत. त्यामुळे बंद टोलनाक्यांचे सांगाडे हटवा, अन्यथा हे सांगाडे छावा स्टाईलने हटवू, असा इशारा छावा मराठा संघटनेचे...
आषाढी वारी सुरक्षितता आवाहन
पुणे- महाराष्ट्र विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने अखेर बहुमत सिद्ध केले आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची फायनल जिंकली आहे. दरम्यान, मतदानादरम्यान विरोधकांनी केलेल्या ईडीच्या नारेबाजीवर उत्तर देताना, ‘होय महाराष्ट्रात ईडीच्या मदतीने सरकार स्थापन झाले आहे, असे ठणकावले.  यात ‘ई’ म्हणजे एकनाथ आणि ‘डी’ म्हणजे देवेंद्र असे म्हणत त्यांनी पलटवार केला.
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपचे आमदार नार्वेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीने एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेची जबाबदारी जावई आणि सासरे यांच्याकडे यांच्याकडे आली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच...
पुणे- क्रीडा क्षेत्रासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळवतानाच एक उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, उत्तम आई, उत्तम सून म्हणूनही आपली सर्व कर्तव्ये राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालयाच्या सेवानिवृत्त उपसंचालिका सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांनी पार पाडली असे गौरोद्गार नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले.
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा (आयसीएआय) ७४ वा स्थापना दिन (सीए दिन) व आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव (६० वर्षे पूर्ती) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. आयसीएआय पुणेच्या वतीने सीए सप्ताहाचे आयोजन केले असून, त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १ जुलै) वॉकेथॉनने झाले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण झाले.
पुणे--हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील करण्याची कारवाई न करण्यासाठी  महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी येथे ही कारवाई करण्यात आली.नलिनी शंकर शिंदे असे लाचखोर महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती. ६२ वर्षीय महिला...