gtag('js', new Date());
पुणे— "हम पुना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन में उड़ाने वाले है", अशी गुगल व्हाईस सर्चद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणाऱ्या निरक्षराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय २२, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव...
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
मुंबई -भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले. राज्याचे...
पुणे- पुण्यातील जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या 14 तास 48 मिनिटात जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (34 किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात सर केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एका वेगळ्या क्रीडाप्रकारात देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे. याबाबत पुणे श्रमिक पत्रकार...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1920 मध्ये सुरू झालेल्या मुकनायक या पाक्षिकात जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांची ‘काय करू आता धरुनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’ तर 1927 साली स्वत: सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ‘आता कोंडद घेऊनि हाती आरूढ पांइये...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- सेना नेतृत्वास अर्ध कालावधीत खाली खेचुन, सरकार पाडण्याचे कुकर्म सेनेच्या बंडखोरांना करावयास लावून, भाजप नेतृत्व महाराष्ट्राची स्थिरता व प्रगतीत खीळ घालून, राज्यास अनेक वर्षे मागे खेचण्याचेच पाप करत आहे, यातून भाजपचा सत्तालोलुप हव्यास अखेर ऊघड झाला आहे, असा आरोप कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते  गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. भाजपच्या या खेळीचा बंडखोरांनी बोध घ्यायला हवा असे...
पुणे- शिवसेनेतील बंडाचे लोन पुण्यातही पसरले आहे. पुरंदर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले.हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका म्हणजे...