gtag('js', new Date());
नवी दिल्ली - देशाच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपतीसाठी मंगळवारी मतदान झाले आहे. आता 21 जुलैला निकाल लागणार आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार की यशवंत सिन्हा यांच्या रूपाने विरोधक चमत्कार करणार हे या दिवशी ठरेल.मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जोरदार मानली जात आहे. मुर्मू दीड लाखांहून अधिक...
नवी दिल्ली -16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये ९९ टक्क्यांहून अधिक खासदार आणि आमदारांनी मतदान केले. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत.मतदानानंतर आता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय अधिक भक्कम होताना दिसत आहे. अनेक विरोधी आमदारांनी मुर्मू यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी...
पुणे-भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या...
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच...
पुणे—पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी -चिंचवड शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत तर पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुखही शिंदे गटात सामील झाले आहेत.  खासदार बारणे यांचे समर्थक आणि आढळराव यांचे समर्थकही शिंदे गटात जातात की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत...
पुणे-राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका दिला आहे. नगरविकास विभागाकडून बारामती नगरपरिषदेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७० कोटींच्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी एकट्या बारामती शहराला २७० कोटींचा...