gtag('js', new Date());
पुणे--महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे २५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे दि. २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त व निर्देशक साहू अखिलेश जैन (दिल्ली) आणि दैनिक पंजाब केसरीचे...
पुणे-पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे.डीएसके...
पुणे - राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान अंतर्गत  एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे ऊर्जा विभागाने ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स बसवण्याबाबत मार्गदर्शक म्हणून मुख्य इलेक्ट्रीकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील ७० -मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये...
पुणे-पूर्वीप्रमाणे आजच्या काळात फुटीला मान्यता नाही. आताच्या कायद्यानुसार फुटून निघताना तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. सध्या शिवसेना कुणाची यावरून वाद होत आहे. ज्या पक्षाचे रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाकडे आहे आणि ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेले आहे, सेना त्यांची, असे कायदा सांगतो. या कायद्यानुसार उद्धव ठाकरे यांनाच संपूर्ण अधिकार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी...
पुणे-केंद्रातील मोदी सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू असून, विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अखिल...
पुणे--आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर या जोडीला पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.याप्रकरणी आमदार माधुरी...