विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर – पृथ्वीराज चव्हाण


पुणे-केंद्रातील मोदी सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू असून, विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी व अन्य नेत्यांनी सहभाग घेतला.

अधिक वाचा  चॅनल पार्टनर्ससोबत उत्तम समन्वयासाठी क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे पाऊल

या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, भारतातील लोकशाही मूल्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरू आहे. विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. देशातील भाजपा विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. 2015 साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे व त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे.

सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांचीही या वेळी भाषणे झाली. नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी हि राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या, असून सरकारच्या इशार्‍यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. याच प्रकरणात याआधी राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज 10-10 तास चौकशी करण्यात आली. आता सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. परंतु, काँग्रेस पक्ष भाजपा व मोदी सरकारच्या या दडपशाहिला भीक घालत नसून, आम्ही लोकशाहि मार्गाने उत्तर देऊ, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love