पुण्यात कोकण मराठा संस्थेतर्फे ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर मार्गदर्शन’ मेळावा संपन्न

करिअर मार्गदर्शन पुणे (Career Guidance Pune)
करिअर मार्गदर्शन पुणे (Career Guidance Pune)

पुणे(प्रतिनिधी)–कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक ३१ मे २०२६ रोजी स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे येथे समाजातील इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर मार्गदर्शन” या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उदय कुमार (एम.टेक.), संचालक – कुमार क्लासेस, कोथरूड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी व पालकांना गणित विषयाविषयी सखोल मार्गदर्शन करत विविध प्रात्यक्षिकांद्वारे गणिताची भीती कशी दूर करता येते, हे प्रभावीपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सोप्या अध्ययन पद्धतींची माहिती दिली तसेच त्यांच्या शंकांचे समाधान केले.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांनी घडवले त्यांच्या साधेपणाचे दर्शन ..

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर विशेष भर दिला. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी कोणती भूमिका बजावावी, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भविष्यातही आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रकाश भिकू मोरे, श्री. तानाजी शिंदे, श्री. कृष्णा कदम तसेच साई केमिकल, लोटे-खेडचे संचालक श्री. गणेश मोरे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.*

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. यश शिंदे, सचिव श्री. संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. राजन जाधव, सहसचिव श्री. महेश जाधव, खजिनदार श्री. रोहित मोरे, सहखजिनदार श्री. मनीष चव्हाण, चार्टर्ड अकाउंटंट श्री. प्रसाद सकपाळ, उपाध्यक्ष श्री. संतोष भोसले व श्री. नितीन मोरे तसेच प्रविण कदम, सागर निकम, किशोर हळदे, मंगेश हळदे, निखिल मोरे, विकास चव्हाण, सतीश मोरे, ज्ञानेश शिंदे, वीनेश मोरे, रोहित मोरे आणि ऋषिकेश मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा  परदेशात जाणाऱ्या भारतीयांकडे 'ब्रेन ड्रेन' म्हणून न पाहता संस्कृतीचे राजदूत म्हणून पहायला हवे - सुनिल आंबेकर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री. यश शिंदे यांनी केले. उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअर विकासासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love