gtag('js', new Date());
पुणे--ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी आज (१४ सप्टेंबर २०२२)  दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गुलाबमावशी संगमनेरकर' अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंड,जावई असा परिवार आहे.काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारत...
पुणे-  आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, 30 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष, पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे यांचे वयाच्या 56 व्या वर्षी आज आजारपणाने निधन झाले.रिपब्लिकन पार्टीमध्ये ते गेले 30 वर्षापासून कार्य करीत होते. दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे .लोकशाहीर...
पिंपरी -खाजगी, आयटी कंपन्या, शासकीय कार्यालये,शाळा तसेच मॉल्स अशा सर्व महिला काम करतात त्याठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचार आणि छळापासून कायदेशीर संरक्षण देण्यासाठी असलेला पॉश (Prevention Of Sexual Harassment of Women at Workplace) हा कायदा सक्तीचा करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गाताई भोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
डोनेशन ची दुकाने चालवणाऱ्या शिक्षणसम्राटावर कोणी बोलत नाही, लाखभर पगार घेणाऱ्या प्राध्यापक व महाविद्यालयावर कोणी बोलत नाही, कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि शाळांवर कोणी बोलत नाही.माझ्यासकट मीडिया आणि सर्वजण सरकारी शाळा व दवाखान्यावर बोलत राहतात.यात समाज हक्काची भावना आणि खेड्यापाड्यात सर्वदूर त्या असल्याने व डोळ्यासमोर असल्याने त्याविषयी सरपंच ते  आमदार सगळे बोलत राहतात.
पुणे-  उर्जा खात्यातील कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील...
पुणे--पुण्यात रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते हे तुंबले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे पुणेकरांची दैना उडाली होती. याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत बोट दाखवेन तिथे बोट सेवा सुरु करा, असं म्हणत भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खरीखुरी बोट पालिकेसमोर आणत साचलेल्या पाण्यात बोट चालवून अनोखे आंदोलन केले.पुणे शहरात सुरु...