ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन


पुणे–ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी आज (१४ सप्टेंबर २०२२)  दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गुलाबमावशी संगमनेरकर’ अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंड,जावई असा परिवार आहे.

काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारत होता. आता त्यांची मुलगी लावणीसम्राज्ञी वर्षा संगमनेरकर आईची लावणी परंपरा पुढे नेत आहेत. गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या व आपली जन्मभूमी संगमनेरचे नावं आयुष्यभर अभिमानाने मिरवणारी ज्येष्ठ कलावंती ‘गुलाबमावशी संगमनेरकर’ म्हणून ओळखायचे. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या घरात लावणी परंपरा असल्या कारणाने त्यांना लहानपणापासूनच लावणीची गोडी लागली. त्या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंत होत्या. त्या बैठकीच्या लावणीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांनी फडाच्या तमाशात देखील काम केले असून रज्जो या चित्रपटात काम केले .त्या हुरहुन्नरी कलाकार होत्या. त्यांना लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या होत्या.लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी