gtag('js', new Date());
रोहित पवार भाजप महायुती आरोप (Rohit Pawar BJP Mahayuti Allegations)
पुणे (प्रतिनिधी)-विरोधी पक्षातील नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना फोडून लोकशाहीची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजप आणि सत्ताधारी महायुतीकडून केला जात असून, यामुळे जनतेचा लोकशाहीवरील आणि मतदानावरचा विश्वास उडू शकतो, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली. अशा प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहिल्यास २०२९ नंतर या देशामध्ये संविधान शिल्लक राहील की नाही, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,...
पुणे सिंहगड रस्ता रानगवा बचाव मोहीम (Pune Sinhgad Road Gaur Rescue Operation)
पुणे(प्रतिनिधी)--सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या हिंगणे खुर्द परिसरात मंगळवारी सकाळी एका रानगव्याने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली. विश्रांती नगर येथील नवीन कॅनॉल रोड लगत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या दोन मोठ्या बंदिस्त जलवाहिन्यांच्या मध्ये हा गवा अडकला होता. वन विभाग, पुणे शहर पोलीस, अग्निशमन दल आणि 'रेस्क्यू' चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्तपणे राबवलेल्या अत्यंत आव्हानात्मक मोहिमेनंतर या गव्याची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, सध्या...
Sachin Ahir joins Shinde faction
महाराष्ट्राच्या  राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 'धक्कातंत्राचा' वापर करत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावान आणि वरळीचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन अहीर यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राजकीय...
CQRA NABCB accreditation
पुणे(प्रतिनिधी) : पुणेस्थित कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी (सीक्यूआरए) ही संस्था बांधकाम प्रकल्पांसाठी सेक्टर ३५ (क्वांटिटी सर्व्हेइंग आणि बिलिंग ऑडिट्स) या क्षेत्रात नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज (एनएबिसीबी) यांचे मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली तपासणी व प्रमाणन संस्था ठरली आहे. एनएबिसीबी ही संस्था क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची घटक संस्था असून आशिया-पॅसिफिक क्षेत्रात तिच्या मानांकनाला मान्यता आहे.यासोबतच एनएबिसीबीने...
नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण
पुणे(प्रतिनिधी)--संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुण्याच्या सत्र न्यायालयाने सोमवारी( दि. २९ जून) ऐतिहासिक निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला 'मरेपर्यंत फाशी' (Hang till death) ची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या ५५ दिवसांत लागलेला हा निकाल राज्याच्या कायदेशीर इतिहासातील सर्वात...
समरसता लोककला संमेलन रघुवीर खेडकर
पुणे(प्रतिनिधी)--समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे. मात्र, लोककलावंत अद्यापही उपेक्षितांचे जगणे जगत असून, त्यांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी  येथे केली. मुख्यमंत्री व सहकारीमंत्र्यांनी लोककलावंतांची कैफियत ऐकून घेतली पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा...