पुणे-मुंबई
पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी (provisional candidature) केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली रद्द : भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून बाद करण्याचा निर्णय
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी (provisional candidature) केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे. तसेच युपीएससीने पूजा खेडकर हिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.पूजा खेडकरने यूपीएससी पास होण्यासाठी अनेक कारनामे केल्याचं समोर आलं होतं. तिने...
महत्वाच्या बातम्या
प्रशासनाने बंद केलेल्या PHH शिधा पत्रिका तात्काळ सुरु करण्यात याव्यात : शाम देशपांडे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--अन्न सुरक्षा योजनेसाठी शासन निर्णयानुसार वार्षिक उत्पन्न शहरीभागासाठी ५९००० रु. पेक्षा कमी असणाऱ्या व ग्रामीण भागासाठी ४४००० रु. पेक्षा कमी असणान्या PHH शिधा पत्रिका धारकांनी दोन महिना शिधा घेतला नाही म्हणून त्यांच्या शिधा पत्रिका अन्नधान्य वितरण प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या खासकरून गणपती व दसरा, दिवाळी सणांच्या पार्शभूमीवर ज्या PHH शिधा पत्रिका प्रशासनाने बंद केलेल्या आहेत त्या तात्काळ...
पुणे-मुंबई
पूजा खेडकरला केंद्र शासनाच्या कर्मचारी प्रशिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) -वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी येत्या २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश पूजा खेडकर हिला देण्यात आले आहेत.पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी...
महत्वाच्या बातम्या
पुण्याच्या पुराला साबरमती प्रकल्पाचे अनुकरण जबाबदार : मुठा नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- गुजरातमधील साबरमती व पुण्यातील मुठा नदी यांच्यात भौगोलिक व नैसर्गिक भिन्नता आहे. त्यामुळे एक नदी सौंदर्यीकरणाचा प्रकल्प दुसरीकडे त्याच पद्धतीने राबविणे, हीच मुळात चुकीची बाब आहे. पुण्याच्या पुराला हा नदी सौंदर्यीकरणाचा घाटच कारणीभूत असून, या प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आमचे सरकार आले, तर हा प्रकल्पच...
महत्वाच्या बातम्या
मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील? : चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने मांडायला हवे होते, ते मांडले नाही. उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यामुळे ते आंदोलकांना कशाला भेटतील, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाकरेंवर हल्लाबोल केला. कोणत्या पक्षाचे, कोणत्या घटकाचे याचा विचार न करता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना तत्काळ भेटायला हवे होते,...
पुणे-मुंबई
भारतातील ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोचविण्यासाठी सरकारी – खाजगी भागीदारी महत्वाची : डॉ. आर. जी. अगरवाल
News24Pune -
पुणे- माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, प्रिसीजन अॅग्रिकल्चर, ड्रोन या तंत्रज्ञानाचा भारतीय कृषि क्षेत्रात तातडीने अंतर्भूत करण्याच्या गरज असून भारतातील ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकरी यांच्यापर्यंत हे नवे तंत्रज्ञान पोचविण्यासाठी सरकारी – खाजगी भागीदारी महत्वाची आहे असे मत धनुका उद्योगसमूहाचे डॉ. आर. जी. अगरवाल यांनी विषद केले.
पुणे कृषि महाविद्यालय कृषि विज्ञान केंद्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते....













