gtag('js', new Date());
वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे
पुणे(प्रतिनिधि)-- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांमधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन", असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "एकतर तू राहशील नाहीतर मी राहिन",...
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पुणे(प्रतिनिधि)--प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची युपीएससीने उमेदवारी रद्द केल्यानंतर पूजा खेडकर हिचा दिल्लीतील पटियाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकर हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजाने अटक टाळण्यासाठी धावाधाव करण्यास सुरुवात केली असून तिने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची...
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर
पुणे(प्रतिनिधि)-- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अनुसरून सामाजिक आयुष्यात अमुल्य योगदान दिल्याल्या व्यक्तींना विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने 'साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४' च्या पुरस्कारांची घोषणा विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव...
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा :
पुणे(प्रतिनिधी) : 'स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या कुस्तीसाठीच्या योगदानाची माहिती तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेबद्दलची माहिती मोहोळ यांनी मांडविया यांना दिली.याबाबत...
Goodness has nothing to do with caste-religion
पुणे(प्रतिनिधि)--चांगुलपणाला जात-धर्माचा संबंध नसतो. चांगुलपणात अभिजन-बहुजन असा भेद करता येत नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा जपून वाटचाल करीत असलेल्या ज्ञानेश्वर मोळक यांनी महापुरुषांच्या सुसंवादाची भूमिका आयुष्यभर जपली आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे. पण मोळक हे विवेकी, सत्यनिष्ठ...
अभंगगाथेच्या प्रेरणेतून प्रगतीची ‘एमपीएससी'त भरारी
पुणे(प्रतिनिधी)-एमपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी संधी हुकली...त्याने मन काहीसे हताश झाले....तेव्हा तुकोबांच्या अभंगगाथेने मोठा आधार दिला... असाध्य ते साध्य करिता सायास, या जगद्गुरूंच्या शब्दांतून प्रेरणा घेत अखेर पिंपरीतल्या चिखली, मोरेवस्ती येथील रिक्षाचालकाच्या कन्येने एमपीएससीत यशाचा झेंडा फडकवला.प्रगती शिवाजी काशीद, असे या जिद्दी मुलीचे नाव आहे. विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांना गवसणी घालण्याची...