gtag('js', new Date());
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेतपुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकऊनची मुदत आज मध्यरात्री संपत आहे. १० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा काही पहिल्यासारखे सुरु होईल असे जर आपल्याला वाटत असेल तर जरा थांबा.. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’ होण्याची शक्यता आहे....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— येत्या 5 ऑगस्ट रोजी ‘अभिजित’ मुहूर्तावर श्रीरामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये मोदी यांच्यासाठी ‘अभिजित’ मुहूर्ताचे ३२ सेकंद हे खूप खास असणार आहेत. पाच ऑगस्टला दुपारी १२ वाजून १५ मिनिटे आणि १५ सेकंदानंतर बरोबर ३२ सेकंदात पहिली वीट ठेवणे बंधनकारक आहे.
अफवा असल्याचं बच्चन यांनी केले ट्वीटमुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कोरोनाच्या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच माध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, ही माहिती खोटी, बेजबाबदार आणि अफवा असल्याचंस्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट...
मुंबई—भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जयहिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी घोषणा दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज देत हे राज्यसभेचे सभागृह नसून आपला कक्ष आहे, येथे फक्त शपथ घेतली जाते असे सुनावल्याच्या वृत्ताने देशातील आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.‘शिवरायांचं नाव घेत सत्तेवर आलेला...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—पन्नास हजार रुपये प्रतीतोळ्याची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने आज वायदे बाजारात पुन्हा भाव खाल्ला आहे. वायदे बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 0.16 टक्क्यांनी वाढून 50,158 रुपये झाला आहे. दुसरीकडे वेगाने दर वाढलेल्या चांदीचा दर मात्र,   0.4 टक्क्यांनी  घसरून 60,870  रुपये प्रतिकिलोवर आला. याअगोदर पहिल्यांदाच, भारतातील सोन्याच्या  दराने वायदा बाजारात प्रति 10 ग्रॅम...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--कोरोनाच्या संकटामुळे जगामध्ये अनेक बदल घडत आहेत. कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही फार मोठा परिणाम झाला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाचा स्वीकार करत या क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत.  स्टार स्पोर्ट्सने सेंच्युरियन पार्क येथे भरवलेल्या तीन संघांमधील 36  षटकांच्या सामन्यात 'व्हर्च्युअल कॉमेंट्री’चा प्रयोग केला होता. आयपीएल 2020 युएईमध्ये होणार आहे, तेव्हाही असे नवीन प्रयोग पाहायला...