प्रशासनाने बंद केलेल्या PHH शिधा पत्रिका तात्काळ सुरु करण्यात याव्यात : शाम देशपांडे

प्रशासनाने बंद केलेल्या PHH शिधा पत्रिका तात्काळ सुरु करण्यात याव्यात
प्रशासनाने बंद केलेल्या PHH शिधा पत्रिका तात्काळ सुरु करण्यात याव्यात

पुणे(प्रतिनिधि)–अन्न सुरक्षा योजनेसाठी शासन निर्णयानुसार वार्षिक उत्पन्न शहरीभागासाठी ५९००० रु. पेक्षा कमी असणाऱ्या व ग्रामीण भागासाठी ४४००० रु. पेक्षा कमी असणान्या PHH शिधा पत्रिका धारकांनी दोन महिना शिधा घेतला नाही म्हणून त्यांच्या शिधा पत्रिका अन्नधान्य वितरण प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या खासकरून गणपती व दसरा, दिवाळी सणांच्या पार्शभूमीवर ज्या PHH शिधा पत्रिका प्रशासनाने  बंद केलेल्या आहेत त्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी भा.ज.प. पुणे शहराचे उपाध्यक्ष शाम देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  कोश्यारी खासगीत म्हणतात की,मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे- अजित पवार

पुणे शहरामध्ये जवळपास ३०% PHH शिधा पत्रिका या कारणास्तव बंद झालेल्या आहेत. ही संख्या मोठी असून या सर्वांची परिस्थती हलाखीची आहे. तसेच नवीन शिधा पत्रिकाधारकांनाही तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा अशी देखील मोठी मागणी आहे.  संबंधित अन्नधान्य वितरक अधिकारी मान्य केलेला इष्टांक सांभाळण्यासाठी जाणून बुजून दोन महिन्याचा नियम लावून धान्य वितरण बंद करत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येक शहरासाठी PHH कार्डचा इष्टांक तात्काळ वाढवण्याची गरज आहे.’ असेही देशपांडे यांनी नमूद केले.  प्रशासनाने तातडीने ह्याची दखल घेवून, दोन महिने शिधा न घेतल्यास तात्काळ PHH शिधा पत्रिका बंद करण्याची अट रद्द करावी, त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना धान्यापासून वंचित राहण्यापासून दिलासा मिळेल असे देशपांडे म्हणाले.

अधिक वाचा  आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

दरम्यान केंद्राच्या निर्णयानुसार खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी संबंधित अद्ययावत माहितीचा अहवाल राज्य सरकारने महापालिकेकडे मागविला होता. त्या संदर्भात, पुणे शहरातल्या महसुलामध्ये योग्य तरतूद करण्याची मागणी देखील शाम देशपांडे यांनी केली असून त्यासाठी त्यांनी मा.ना. मुरलीधर मोहोळ, तसेच ना. चंद्रकांतदादा पाटील व खा. मेधाताई कुलकर्णी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love