कोरोना योद्धांसाठी ‘आरोग्यं धनसंपदा उपक्रम’ – क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम


पुणे -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत.स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला असून त्याचा प्रारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे अध्यक्ष अरुण जिंदल, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेत कोविड योद्धासाठी मास्क, सॅनिटायझर, पी पी इ किट पुरविण्यात येणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

अधिक वाचा  निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा- प्रवीण तरडे

चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून लढाई लढणाऱ्या सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. या साहित्याची आवश्यकता असणाऱ्यांनी संदीप खर्डेकर यांच्याशी 9850999995 वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love