‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण  

301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati
301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे. (301 kg Motichur Modak to ‘Dagdusheth’ Ganapati)

प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे दीपक मालाणी, निखिल मालाणी यांनी  ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि किगा समूहाचे संचालक गणेश गोसावी व किरण साळुंके यांनी १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच भक्तांना दोन्ही मोदक प्रसाद म्हणून देण्यात आले.

अधिक वाचा  आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून 'दगडूशेठ' गणपती ट्रस्टतर्फे गरजूंची रुग्णसेवा

निखिल मालाणी म्हणाले, आम्ही ३०१ किलो मोतीचूर मोदक बाप्पाला मोदक अर्पण केला आहे. तब्बल २० वर्षांपूर्वी ५ किलो मोदकापासून आम्ही सुरुवात केली होती. यावर्षी ३०१ किलोचा मोदक तयार करण्याकरिता मोठा कालावधी लागला. तसेच याकरिता अनेक कारागिरांनी मेहनत घेतली.

गणेश गोसावी म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे १३१ वे वर्षे असल्याने १३१ लिटरचे आईस्क्रीम केले. याकरिता नारळाचा किस, दूध १०० लिटर यांसह इतर साम्रगी वापरण्यात आली. सुमारे ७ ते ८ दिवस आईस्क्रीम तयार करण्याकरिता लागले. तसेच उणे २२ अंशात हे तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध प्रकारचे आईस्क्रीम बाप्पाला अर्पण करीत आहोत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love