#एमपीएससी विद्यार्थी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


पुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. जोपर्यंत राज्यशासन निर्णय बदलत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा आठवडाभरात होतील अशी घोषणा केली. उद्या(शुक्रवारी) परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल असे त्यांनी म्हटले होते. परंतु, तरीही ही परीक्षा 14 मार्चलाच घेण्यात यावी यासाठी विद्यार्थी आणि पडळकर  ठिय्या सोडायला तयार नव्हते. दरम्यान, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोठा पोलिस फाटा आंदोलनाच्या ठिकाणी आला आणि त्यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितले. मात्र, गोपीचंद पडळकर मात्र, त्यांच्या निर्णयावार ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला.

अधिक वाचा  मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही - वळसे पाटील

राज्यातील काण्याकोपऱ्यातून इथे हजारो विद्यार्थी आले आहेत. मी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थी म्हणाले इथेच थांबायचं तर इथेच थांबणार आहे. मी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. विद्यार्थ्यांची जी भूमिका असेल ती आमची असेल. येत्या 14 तारखेला परीक्षा व्हावी हाच आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका जाहीर केली आहे ती विद्यार्थ्यांच्या हिताची नाही असे म्हणत पडळकर आंदोलनाच्या ठिकाणी ठाण मांडून होते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना तंबायत घेतले आणि विद्यार्थ्यांना तया ठिकाणाहून निगुण जाण्यास सांगितले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love