NDA and India Front will come face to face

#पंतप्रधान मोदी पुणे दौरा: एनडीए व इंडिया फ्रंट आमनेसामने येणार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने एनडीए (nda) व इंडिया फ्रंट (India Front) दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur)घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव(Dr. Baba Adhav) यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने (bjp)घेतला आहे. (NDA and India Front will face each other)

मणिपूरच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांविरोधात इंडिया आघाडीकडून निदर्शन केली जाणार आहे. इंडिया फ्रंटच्या वतीने मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंडईतील हुतात्मा बाबू गेनू चौक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याचे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, रिपब्लिकन, डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटनांचा समावेश असेल. तर भाजपा प्रतिआंदोलन करणार असून, दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

 ‘नरेंद्र मोदी चले जाव

दरम्यान, ‘नरेंद्र मोदी चले जाव’, अशी या आंदोलनाची संकल्पना आहे. आंदोलनात गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, (Dr. Kumar Saptarshi) काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे(Arvind Shinde), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नितीन पवार, सुभाष वारे हेही सहभागी होतील.

या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, मागच्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळते आहे. येथील हिंसाचारात आत्तापर्यंत शेकडो जणांचे बळी गेले असून, महिलांवरील अत्याचाराने साऱया जगभर वाईट संदेश गेला आहे. मात्र, तरीही केवळ 70 मिनिटांचे हवाई अंतर असताना पंतप्रधान मणिपुरात पोहोचू शकलेले नाहीत. दोन तासांचे अंतर असलेल्या पुण्यात मात्र ते हजेरी लावत आहेत. हे दुर्दैवी असून, त्याविरोधातच हे आंदोलन आहे.

 भाजप देणार जशास तसे उत्तर देणार 

माजी महापौर व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन होत असून, विकासप्रक्रियेमुळे आनंदित झालेले पुणेकर त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मात्र, अशा प्रसंगी विरोधक आंदोलनाचीच भूमिका घेणार असतील, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. पुण्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यक्रम नाहीत. १२ किमीच्या मेट्रो मार्गाचेही उद्घाटन होत असून, यात मिठाचा खडा टाकण्याचे काही कारण नाही. आम्ही सर्वांचे स्वागत केले आहे. मात्र, तरीही विरोधक आंदोलन करणार असतील, तर त्याचा निषेध म्हणूनच आम्हीही आंदोलन करू. विरोधकांचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी आहे.

 पवार उपस्थित असताना आंदोलन हा दुटप्पीपणा 

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तर दुसऱया बाजूला काँग्रेसची परंपरा पुढे नेणाऱया टिळक कुटुंबियांकडून पंतप्रधानांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. असे असताना आंदोलन करणे, हा दुटप्पीपणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी (शरद पवार गट) विरोधासाठी विरोध करू नये. मुळात मोदीद्वेषाने हे पक्ष व त्यांचे नेते पछाडले आहेत. त्यांना आम्ही योग्य ते उत्तर देऊ.  त्याचबरोबर पोलिसांनी विरोधकांच्या आंदोलन रोखावे व शांततेने हा कार्यक्रम होऊ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

 कार्यक्रम आधीच ठरला होता : राष्ट्रवादी 

पक्षाचे नेते शरद पवार हे ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, हा कार्यक्रम आधीच ठरला होता. त्याचबरोबर सामाजिक भूमिकेतून पक्ष आंदोलन करीत आहे. त्यामुळे दुटप्पीपणाचा काही प्रश्न आहे, असे उत्तरही प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *