मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी – किरीट सोमय्या

राजकारण
Spread the love

पुणे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. जाधव यांनी सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध आहेत. हा हल्ला झाला तेव्हा पोलीस अधिकारी हेमंत करकरेंनी घातलेलं बुलेटप्रूफ जॅकेट बोगस होतं. करकरेंच्या मृत्यूसाठी बोगस बुलेटप्रुफ जॅकेट जबाबदार असून, या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा हा विमल अग्रवाल यांच्या कंपनीकडून होत होता. यशवंत जाधव यांच्यावरील धाडीनंतर विमल अग्रवाल यांचं नाव चर्चेत आलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांचे विमल अग्रवाल यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला. तसेच यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांनी १०००  कोटींची काळी माया जमवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी, पुत्र आदित्य आणि तेजस तसेच मुख्यमंत्र्यांचा मेहुणा पाटणकर हे नेमके कोणाकोणाचे पार्टनर आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. मुंबईत झालेल्या २६/११  हल्ल्याच्यावेळी हा घोटाळा उघडकीस आला होता. बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव सोबत यांनी भागीदारीत कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स, असे आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि.कडून ८०  कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमैय्यांननी यावेळी केला.

सोमैय्या यांना महागाईवर विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या जनतेला मूर्ख समजत आहेत. लूटमार करायची म्हणून तुम्हाला सरकारच्या तिजोरीत पैसे हवे. हे पैसे मेट्रोच्या कामासाठी नाही तर त्यांना वसुलीसाठी हवे आहे. मोदी सरकारने जो ४ वर्षात १९ रुपये कर वाढवला तो पूर्ण कर कमी केला आहे. देशातील जनतेला दिलासा दिला आहे. पण, राज्य सरकारने या दोन वर्षात १४ रुपये पेट्रोल डिझेलमध्ये वाढ केली. पेट्रोल डिझेल हा जीएसटीमध्ये येत नाही. १४ रुपये वाढवून दीड रुपया कमी करत आहे, अशी टिका यावेळी सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर केली.

अनिल परब यांचे हॉटेल पाडले जाईल

 शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांचे हॉटेल केंद्रीय पर्यावरण विभागाकडून या आठवड्यात पाडले जाईल. त्या हॉटेलचे वीज व पाण्याचे कनेक्शन कापण्यात यावे, अशी विनंती रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचेही सोमैय्या यांनी सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटींची मनिलाँड्रींग केली आहे. १६ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली की स्वतःच्या नावाने, असा प्रश्न शरद पवार यांनी मुश्रीफ यांना विचारावा, असेही सोमैय्या म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *