एमपीएससी परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग कमी पडला – अजित पवार


पुणे- विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) कमी पडला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले.

पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक एमपीएससीने हे सर्व प्रकरण व्यवस्थितपणे हाताळायला हवे होते. मात्र, हा प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले, हे माझे वैयक्तिक मत आहे. आता राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. उद्धव ठाकरे यांनी निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकारकडून केले जाईल आणि आमचा त्याला पाठिंबा राहील. झाली ती दुर्दैवी घटना म्हटली पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ यायला नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अधिक वाचा  महाविकास आघाडीची वज्रमुठ ढिली : अजित दादांनी केला पुणे लोकसभेच्या जागेवर दावा

एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमपीएससीच्या प्रश्नात राजकारण आणण्याची गरज नाही. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे. सरकार काहीतरी वेगळे करत आहे, असे भासवण्याचा काहींनी प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो असून, त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने वातावरण खराब करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love