पुणे- शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या गोयंका ग्लोबल एज्युकेशन पुण्यात कल्याणीनगर येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल (एफआयएस) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील फिन्नीश अभ्यासक्रमाची माहिती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनशास्त्र आणि वैयक्तिकृत शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.
फिनलँड इंटरनॅशनल स्कूल पुणेच्या प्राचार्या मिन्ना रेपो यांनी फिन्नीश शिक्षणाने केलेल्या शैक्षणिक सुधारणांविषयी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोहा अली खानसह पुण्यातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये त्यांना संस्था आणि अभ्यासक्रमाबद्दल काही नवीन माहिती मिळाली. फिनलँड दूतावासातील वरिष्ठ विशेषज्ञ मिका टिरोनेन यांनीही कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अभिनेत्री सोहा अली खान म्हणाली की मी एका चार वर्षांच्या मुलीची आई आहे. आर्इ झाल्याने आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. फिनलँड इंटरनॅशनल स्कूल पुणे येथील अभ्यासक्रम मुलांसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणेल. कारण सध्याच्या काळात सर्वांगीण विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे. पालक या नात्याने हा निश्चितच खूप परिणामकारक बदल आहे. गोयंका ग्लोबल एज्युकेशन या प्रतिष्ठित संस्थेला त्यांच्या व्हीजन आणि उद्देशासाठी खूप खूप शुभेच्छा.
गोयंका ग्लोबल एज्युकेशन हा एक उपक्रम आहे, जो नावीन्यपूर्ण आणि अनुभवात्मक शिक्षण वातावरणाद्वारे सर्वांगीण आणि परिवर्तनशील शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विघटनकारी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर संस्थेचा विश्वास आहे. जगात असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिकण्याच्या विविध पैलूंमध्ये विद्यार्थ्यांचे पालनपोषण आणि प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे विचार, क्षमता आणि कौशल्य असलेले सक्षम बनविण्याभोवती केंद्रित आहे. ज्यामुळे विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील, याची खात्री केली जाते.
गोयंका ग्लोबल एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक शशांक गोयंका म्हणाले की, “जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि परिणामकारक असा अभ्यासक्रम स्कूलमध्ये आणण्याची कल्पना आहे. विद्यार्थ्यांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने मार्ग शोधत असतो. आम्हाला खात्री आहे की, पुण्यातील फिनलँड इंटरनॅशनल स्कूल ही संस्था या पिढीच्या जीवनावर अभूतपूर्व परिणाम करेल. या उपक्रमाद्वारे, आम्ही अध्यापनशास्त्रावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि देशातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी भारत सरकारने सादर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या सुसंगतपणे काम करत आहोत.”
फिनलँड इंटरनॅशनल स्कूल पुणे यांनी विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम तयार केला आहे. केजी ते बारावीपर्यंत शालेय विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आणि आयजीसीएसर्इ, आयबी आणि फिन्नीश यांचा समावेश असलेला अभ्यासक्रम उपलब्ध करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना फिनलँड बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाकडून दुहेरी मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळेल. एफआयएसमधील 70 टक्के शिक्षक फिनलँडमधून येतील आणि इतर 30 टक्के भारतीय शिक्षक असतील ज्यांना विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण पद्धती प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. ही भारतातील अशा प्रकारची पहिली फिन्निश शाळा आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी शाश्वत शिक्षण मॉडेल तयार करणे, सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे आहे. शिवाय मुलासाठी खेळाच्या अध्यापनशास्त्रीय शक्यतांना महत्त्व दिले गेले आहे. ज्यामुळे शिक्षण तसेच व्यक्तीच्या प्रगतीस गती मिळते.