राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- समर्थ भारत पुनर्बांधणी उपक्रमा अंतर्गत रक्तदान आणि प्लाझ्मा दाता नोंदणी शिबीर संपन्न

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss)- समर्थ भारत पुनर्बांधणी उपक्रमा अंतर्गत,(Samarth Bharat Reconstruction Initiative), जनकल्याण रक्तपेढी (JANKALYAN BLOOD BANK) आयोजित, रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मादान प्रबोधन, चाचणी,आणि प्लाझ्मा दाता नोंदणी शिबीराचे आयोजन जनसेवा न्यास,(JANSEVA NYAS) हडपसर  येथे करण्यात आले होते.   हडपसर भागातील अनेक नागरिक,स्वयंसेवक यांनी मिळून  उत्साह पूर्ण वातावरणात,  कारोनाचे सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आले.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या चाचण्या करून एकूण ५५ दात्यांनी  स्वेच्छेने रक्तदान केले यात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता. तसेच एकूण १० दात्यांनी प्लाझ्मादान करण्यासाठी आपले नाव नोंदवून चाचण्या करवून घेतल्या.   

रक्तदान आणि प्लाझ्मा दान याविषयी जागरूकता वाढावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ भारत पुनर्बांधणी अभियानातर्फे  जनकल्याण रक्तपेढीद्वारा करीत असलेल्या प्रयत्नांनंतर अनेक नागरिकांमधील भीती कमी होताना दिसत आहे. तसेच  प्लाझ्मादान ही काळाची गरज आहे व ते दिल्याने दात्याला काहीही त्रास होत नाही.  आपल्या परिवार, मित्रमंडळी तसेच परिचित व्यक्तींना प्लाझ्मादान आणि रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हडपसर भाग संघचालक प्रवीणजी पाताळे, भाग कार्यवाह मिलिंदजी वाईकर,डॉ.नितीन शिंदे,डॉ अर्चना चव्हाण आणि हडपसर भागातील स्वयंसेवक,नागरिक,युवा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर रक्तदान शिबीर व प्लाझ्मा दान प्रबोधन शिबीर हडपसर येथील जनसेवा न्यास येथे आयोजिले होते.
जनकल्याण रक्तपेढी चे तज्ञ डॉक्टर्स,कर्मचारी वर्ग यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *