एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना वाटणार श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती-प्रा.डॉ. विश्वनाथ कराड


पुणे–विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वधर्माचे मर्म अंतर्भूत असलेल्या श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख ग्रंथ प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.” अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १५९ वीं जयंती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा.निरंजन खैरे व विष्णू भिसे हे उपस्थित होते.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली जागतिक धर्म परिषदेमध्ये भाकित केल्या प्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती  नांदेल. तसेच त्यांनी १८९७ साली पुन्हा भाकित केले की ५० वर्षानंतर माझी भारत माता स्वतंत्र होईल. त्याप्रमाणे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.  पुढे त्यांनी भाकीत केले की,२१ व्या शतकात माझी भारत माता ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. त्या प्रमाणे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. स्वामी विवेकांनदांनी जगाला भारताची ओळख करुन दिली. त्यांच्या कडे असलेली दूरदृष्टी आणि वाचासिद्धी असलेले युगपुरूष होते. धर्म, प्रार्थना आणि ज्ञान याबद्दलचे विवेचन योग्य प्रकारे स्वामी विवेकानंदांनी जगासमोर मांडले आहे. प्रत्येकाने स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेतला पाहिजे.”

अधिक वाचा  लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

“लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा घुमट नसून त्यातून दिला जाणारा संदेश महत्वाचा आहे. ती एक अध्यात्मिक प्रयोगशाळाच आहे. येथून संपूर्ण मानवजातीला शांतीचा व मानवतेचा संदेश दिला जाईल. २ एप्रिल २०२२ म्हणजेच गुडीपाडव्याच्या निमित्ताने ही वास्तू भारतीय जनतेला अर्पण केली जाणार आहे. दि. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, ३ फे्रबुवारी २०२२ अर्थात भारतीय अस्मिता दिन आणि २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडवा यांचे औचित्य साधून या ग्रंथाच्या प्रतीचे वितरण केले जाणार आहे.”

प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“स्वामी विवेकांनद हे आधुनिक काळातील संत ज्ञानेश्वर आहेत. एकीकडे संपूर्ण जगाने भौतिक प्रगती केली आहे. परंतु आज संपूर्ण जगाला भारतीय कुटुंब पद्धती आकर्षित करीत आहे. या देशाला स्वामी विवेकानंद आणि साधु संतांचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे हा देश जगाचे आध्यात्मिक नेतृत्व करेल.”

अधिक वाचा  संत मुक्ताबाई

डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस भारताने १९८५ साला पासून १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. स्वामींचे विचार देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. २१ व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उद्यास येईल. त्याचे उत्तरदायित्व नवयुवकांकडे असल्याने त्यांनी स्वामींजींचा आदर्श घेतला पाहिजे.”

डॉ. मिलिंद पात्रे, विष्णू भिसे आणि निरंजन खैरे यांनी देखील स्वामी विवेकानंदांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love