अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार: दोघांना अटक

Deaf 17-year-old girl raped in Pune
Deaf 17-year-old girl raped in Pune

पुणे— पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय १५ वर्षे असून तिच्या चार मित्रांनीच हे दुष्कृत्य केले असल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून इतर दोघाजणांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात पॉस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पिडीत मुलीचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.  मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आलेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीचे तिच्या आईशी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी भांडण  झाले होते त्यामुळेटी रागाच्या भारत घर सोडून गेली होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या एका तरुणाने तिला गावी सोडतो म्हणून तो तिला रिक्षातून घेऊन गेला आणि एका इमारतीच्या टेरेसवर तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे त्यानंतर त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. मात्र, त्यानंतर आणखी एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. नंतर या व्यक्तीने तिला बोपदेव गावात आणले. याठिकाणी आरोपी आणि त्याच्या दोन नातेवाइकांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत एका नागरिकाच्या मदतीने हडपसर पोलिसांशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे - हर्षवर्धन जाधव: १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी