हाय प्रोफाईल महिलांसोबत संबंधाचे आमिष दाखवून ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाखांची फसवणूक

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे-हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

दिपाली कैलास शिंदे (२८, रा नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरु होता.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत-हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. फियार्दी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फियार्दी यांची श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातीला २  लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण ६० लाख २०  हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  कौशिकी चक्रबर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने रंगला 'वसंतोत्सव'चा पहिला दिवस

शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला आहे. शिंदे हिच्या मार्फत हा सर्व कट रचणार्‍या मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love