गुलाब नबी आझाद यांच्यासह चार नेत्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवले


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या बदलांमध्ये रणदीप सिंह सुरजेवाला (RANDIP SINGH SURJEVALA)यांना महत्वाचे पद देण्यात आले आहे. सुरजेवाला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी जेष्ठ नेते कपिल सिब्बल (KAPIL SIBBAL)यांचे पक्षातील महत्व कमी करण्यात आले आहे.

 कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य चार वरिष्ठ नेत्यांना सरचिटणीसपदावरून काढून पक्ष संघटनेत मोठा फेरबदल केला आहे.  कॉंग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्ल्यूसी) या पक्षाची सर्वोच्च धोरणनिर्मिती करणारी समितीचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. पक्षाने सुरजेवाला यांना कॉंग्रेसचे सरचिटणीस पद देतानाच कर्नाटकच्या प्रभारी पदीही म्हणून त्यांना नेमण्यात आले आहे. मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष केले गेले आहे. प्रियांका गांधी यांना यूपीचा प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. याशिवाय केसी वेणुगोपाल (VENUGPAL)यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  सोनिया गांधी म्हणाल्या मला पक्षाचे नेतृत्व करण्यात रस नाही? कोण होणार काँगेसचा अध्यक्ष?

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुलाब नबी आझाद, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकण्यात आले आहे. संघटनात्मक परिवर्तनाबाबत ज्या पूर्वी 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते त्यामध्ये आझाद सुद्धा होते. हे पत्र ज्यावेळी देण्यात आले त्या वेलेवरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी खूप नाराज झाले होते. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांना कार्यकारी समितीत स्थान देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या (Congress) २३ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना लिहिलेल्या  पत्रानंतर पक्षात मोठा पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता. याच दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी विधान परिषद सदस्य नसीब पठाण (Naseeb Pathan) यांनी  गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पक्षाकडून घरचा रस्ता दाखवण्याचा यावा, अशी मागणी केली होती.   

अधिक वाचा  ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या -डॉ. विश्वजीत कदम

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love