शिवसेनेतील बंडाचे लोन पुण्यात : माजी मंत्री विजय शिवतारे यांचा बंडाचा झेंडा


पुणे- शिवसेनेतील बंडाचे लोन पुण्यातही पसरले आहे. पुरंदर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले.

हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका म्हणजे दूसरा पर्याय नसून लोकांच्या हितास्तव त्यांना ही भूमिका घेणे भाग पडले आहे असे शिवतारे म्हणाले.यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. आजच्या परिस्थितीला संजय राऊत हे जबाबदार आहेत, अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना विचारा. शिवसेनेला दावणीला बांधण्याचं काम देखील संजय राऊतांनी केलं आहे. ५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचळणीला नेऊन उभा करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक नाराज आहेत असे सांगत आपण दोन हजार कार्यकर्त्यासह ठराव करून त्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात पाठविणार असल्याचे सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम