राज्य बुद्धिबळ सात वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे प्रथम


पुणे – पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तर्फे आयोजित सिम्बॉयसिस क्रीडा संकुल येथे २५ व २६ जून ह्या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या राज्य बुद्धिबळ ७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे आठ पैकी सात गुण मिळवून प्रथम विजेता ठरला कोल्हापूरचा वरद पाटील व्दितीय आला.

राघव पावडे हा पुण्यातील वारजे येथील castle chess academy चा विद्यार्थी असून अनिल राजे त्याचे बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत. न्यु इंडिया स्कूलमध्ये राघव ईयत्ता दुसरीत शिकत आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका देवकी सुतार यांनी राघवचे अभिनंदन केले असून उदयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींच्या गटात मुंबईची अमया रॉय प्रथम तर नागपूरची विश्वजा देशमुख द्वितीय आली.

अधिक वाचा  जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

१५ जुलै पासून उदयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सात वर्षाखालील मुलामुलींचा महाराष्ट्र राज्याचा संघ असा –

मुलांचा संघ

राघव पावडे – ७ गुण प्रथम पुणे

वरद पाटील – ७ गुण द्वितीय कोल्हापूर,

श्रेय डोबल  – साडे सहा गुण तृतीय ठाणे,

दर्श पोरवाल -साडे सहा गुण पुणे

राज आरव   -६ गुण पाचवा रायगड

मुलींचा संघ

अमया रॉय मुंबई- ६ गुण- प्रथम

विश्वजा देशमुख नागपूर- ६ गुण-द्वितीय

प्रमुख पाहुणे सुजनील फार्मा चे व्यवस्थापकीय संचालक आशिष देसाई व पुणे क्लब गोल्फ कोर्सचे अध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर,ग्रँडमास्टर अभिजित कुंटे ह्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.यावेळी आंतरराष्ट्रीय महिला मास्टर मृणालिनी कुंटे,मुख्य पंच विनिता श्रोत्री यांची मुख्य उपस्थिती होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love