#Fadnavis Letter To Sharad Pawar: शरद पवारांच्या गुगलीवर फडणविसांचा टोला

Fadnavis rejected Sharad Pawar's invitation
Fadnavis rejected Sharad Pawar's invitation

Fadnavis letter To Sharad Pawar : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये(Baramati) उद्या(2 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’ला (Namo Maharojgar Melawa) राज्याचे मुख्यमंत्री(CM) एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच बारामती येथे येत आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्रीही येत आहेत ही संधी साधून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते (शरदचंद्र पवार) शरद पवार यांनी गुगली टाकत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या गोविंद बागेतील(Govind Baug) घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) हे निमंत्रण नाकारले आहे. तसे पत्र लिहून त्यांनी शरद पवारांना कळवले आहे. शरद पवारांच्या गुगलीवर फडणवीस यांनी टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Fadnavis rejected Sharad Pawar’s invitation)

अधिक वाचा  भाजपवरच्या नाराजीचा अजित पवारांना फटका - रूपाली ठोंबरे पाटील

बारामतीमध्ये उद्या (२ मार्च)  विद्या प्रतिष्ठान येथील १२ एकरच्या मैदानावर राज्य शासनाच्या वतीने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आहेत. मात्र, निमंत्रितांच्या यादीमधून राज्यसभेतील खासदार शरद पवार यांना वगळण्यात आले आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे पत्र पाठवून गुगली टाकल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट बारामतीमध्ये असलेल्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. तसेच, शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे याना उपस्थित राहायला आवडेल, असेही नमूद केले आहे.

अधिक वाचा  कमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पत्र शरद पवारांना लिहून त्यांचे आभार मानतानाच शरद पवारांचे आमंत्रण नाकारले आहे.

काय म्हटले आहे फडणवीसांनी पत्रात?

आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही, असे फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love