#Teacher Recruitment : शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला : अवघ्या काही तासात सुमारे अडीच हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले

Teacher recruitment has finally started
Teacher recruitment has finally started

(State : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक भरतीला(Teacher Recruitment) अखेर मुहूर्त लागला आहे. आजपासून(दि. ५ फेब्रुवारी) शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत्त पवित्र पोर्टलवर(Pavitra Portal) जाहिरात प्रसिद्ध झाली असून अवघ्या काही तासात सुमारे अडीच हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम( priorities) जनरेट केले आहेत. दरम्यान, जाहिरातीमध्ये अरक्षणासह रिक्त जागांचा तपशील, कोणत्या जिल्ह्यात किती जागा, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गनिहाय जागा या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त(State Education Commisioner) सूरज मांढरे(Suraj Mandhre) यांनी दिली .  (Teacher recruitment has finally started)

पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांच्या १२ हजार ५२२ तर १८ मनपाच्या- २ हजार ९५१ तसेच ८२ नगर पालिका/परिषदाच्या-४७७ आणि  ११२३ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या-५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

अधिक वाचा  २५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होणार

उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिली जाईल. पसंतीक्रम नमूद केल्यानंतर दिनांक ०९/०२/२०२४ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.  त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:

१) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती- ३ हजार १४७, अनुसूचित जमाती-३ हजार ५४२, विमुक्त जाती (अ)- ८६२, भटक्या जमाती (ब)-४०४, भटक्या जमाती (क)-५८२, भटक्या जमाती (ड)-४९३, विशेष मागास प्रवर्ग-२९०, इतर मागास प्रवर्ग-४०२४, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -२३२४, खुला-६१७० याप्रमाणे आहेत. त्याचाप्रमाणे काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत. त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.

अधिक वाचा  हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक - कालीचरण महाराज

२) गट निहाय रिक्त पदे- इ. १ ते ५ वी-१०२४०, इ. ६ ते ८ वी ८ हजार १२७, इ. ९ ते १० वी -२ हजार १७६, इ. ११ ते १२ वी – १ हजार १३५ याप्रमाणे आहेत.

३) माध्यमनिहाय रिक्त पदे – मराठी-१८ हजार ३७३, इंग्रजी-९३१, उर्दू- १ हजार ८५०, हिन्दी-४१०, गुजराथी-१२, कन्नड-८८, तामिळ-८, बंगाली-४, तेलुगू-२ याप्रमाणे आहेत.

४) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय- १६ हजार ७९९, मुलाखतीसह- ४ हजार ८७९ याप्रमाणे आहेत.पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व User Manual देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारे देखील कळविण्यात येत आहे.

पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी [email protected] या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो.अशा बाबींवर अनावश्यक ई-मेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्र व्यवहार करावा, जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love