#AJit Pawar- राज्यातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प ( Submarine Tourism Project) सिंधुदुर्गातून(Sindhudurga) गुजरातला (Gujrat) जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असला, तरी त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून, अशा खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प असून तो राज्याबाहेर जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. (Don’t believe fake news)
कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला (Victory Column) सकाळी अभिवादन केल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. सिंधुदुर्गातील(Sindhudurga) पाणबुडी प्रकल्प ( ( Submarine Tourism Project) गुजरातला हलविण्यात आला असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून यासंदर्भात आरोप करण्यात येत आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, या आरोपास कोणताही आधार नाही. हे वृत्त चुकीचे आहे. पाणबुडी प्रकल्प हा आपल्या राज्याचा आहे. त्यामुळे तो राज्यातूनच जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असतील, तर आम्ही सर्व गप्प बसू का, आम्हाला राज्य चालविण्याचा अनुभव नाही का, असा सवाल पवार यांनी केला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना दिलेल्या आव्हानावर मिमिक्री करत खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, सोम्या-गोम्या काय बोलतात, त्याला मी उत्तर देत नाही. आज देशासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणता ठोस पर्याय नाही. आपल्या देशाची शान ते वाढवत आहे. 80 कोटी जनतेला अन्नधान्य वाटप होत असून जनता उपाशी पोटी झोपू नये, हा त्यांचा उद्देश आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल. काही गोष्टी चुकल्या, तर काही दुरुस्ती करता येतील. परंतु काही नसताना बदनामी करण्याचे काम अलीकडे सुरू आहे ते थांबले पाहिजे. ते आपल्या हिताचे आहे.