अजित पवार म्हणतात तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता का?


पुणे—तुम्ही तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता किंवा त्यांना विचारतात का? असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार काय ट्वीट करतात याकडे फारसं लक्ष देत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असे सांगितले. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता बोलत होते.

विवेक रहाडे या तरुणाने मराठा आरक्षण मुद्द्यावरून आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी, ”विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,’ असं पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याबाबत छेडले असता अजित पवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पवार यांनी त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

अधिक वाचा  #Sharad Pawar Vs Ajit Pawar : समंजस मतदार योग्य निकाल देतील : शरद पवारांचा अजित पवारांना टोला

सरकार कुणाचंही असु द्या, महिलांच्या बाबतीत असं घडणं वाईट”

दरम्यान, हाथरसच्या घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले, “हाथरसची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज महिला विविध पातळींवर काम करत आहेत. असं असताना अशा घटना घडणं दुर्दैवी आहे. कुणाचंही सरकार अस द्या, महिलांच्या बाबतीत असं घडणं वाईट आहे.”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना हाथरस पीडितेच्या कुटुबियांना भेटून देण्यापासून रोखण्याबाबत आणि धक्काबुक्कीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “अशा घटना घडल्यावर कोणीही भेट द्यायला जाऊ शकतं. पूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं. पण भेटायला जाताना अशी अडवणूक का केली हे माहिती नाही. कोणीही सत्तेवर असताना कुणाला असं थांबवू नये. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर गोष्ट वेगळी आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love