परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का? -चंद्रकांत पाटील


पुणे -परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का ? महाराष्ट्रीयन माणूस असे कृत्य करत नाही का ? असा सवाल उपस्थित करत गुन्हे आणि अत्याचारांच्या घटनेवरून एखाद्या समाजाला लक्ष करणे योग्य नाही, असे  मत  भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अत्याचाराच्या घटना व सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवर निषाणा साधला. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत परप्रांनतिय रिक्षा चालकांसंदर्भात झालेल्या निर्णयावर बोलताना पाटील यांनी वरील सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठींबा द्यायला हवा. मात्र, कोवीडच्या काळात सरकारने शक्ती कायद्यासंबंधी बैठक का घेतली नाही, याचे उत्तर देणे गरजेचे आहे. एखाद्या समाजाला लक्ष करणे दुदैवी असून गुन्ह्यांचा अभ्यास केला तर वेगळेच सत्य बाहेर येईल, असेही पाटील म्हणाले.

एखादा अध्यादेश काढून राज्य सरकारला ओबीसी आरक्षण देता येते का हे पाहावे

अधिक वाचा  गुढीपाडवा : गुढीची काठी, घडा, वस्त्र, साखरेची माळ - कशाची आहेत ही प्रतीके?

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होता कामा नयेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे कोणालाही जाता येत नाही. कोणीतरी कायदेशीर सल्ला द्यावा की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एखादा अध्यादेश काढून राज्य सरकारला ओबीसी आरक्षण देता येते का हे पाहावे ,आता सर्व पक्षांकडे एकच पर्याय आहे की, त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागा होत्या त्या-त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिनिधींचे आणि आम्ही ते देणार आहोत. काही ओबीसी संघटना जर सांगत असेल, की ओबीसी आरक्षणानंतरच निवडणुका घ्याव्यात तर ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अवघड आहे. तसे जर सर्वांनी मिळून ठरवले तर भारतीय जनता पक्ष खांद्याला खांदा देऊन आहेच. मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी एका कार्यक्रमात  बोलताना सुरेखा पुणेकरांचे नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते,  असा पलटवार केला आहे. त्यावरून राजकीय गदारोळ उडला आहे.

अधिक वाचा  कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त अभाविपची पुण्यात निदर्शने

दरेकर तसा विचार करणार नाहीत

याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, मराठी भाषेत वाक्यप्रचार एवढे आहेत की,  आपण ते इतक्या सहज पद्धतीने उच्चारतो.  त्याचे फिजीकल अर्थ काढला की वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखे आहे. ते वाक्य त्या-त्या वेळेला समजावण्यासाठी असते. प्रवीण दरेकर यांनी कोणत्या भूमिकेतून म्हटले की, तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचं काही पडले नाही. तुम्हाला श्रीमंत, राजकीयदृष्ट्या प्रभावी आहे अशा लोकांशी घेणेदेणे आहे. त्या अर्थाने त्यांनी ते वाक्य म्हटले आहे. महाविकास आघाडीतील नेते आत्ता सगळेच पॅनिक झाले आहेत. सत्तेत तीन-तीन पक्ष असल्याने सोशल मीडिया, मीडियातून हल्ला बोलावण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीचे अश्लील अर्थ प्रवीण दरेकर यांचा नव्हता आणि तसा विचार ही ते करणार नाहीत, असे देखील यावेळी पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा  शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल - अनिल घनवट

मातोश्रीत बसुन आदेश काढायला काय जाते ?

 भारतीय समाज मोठ असून तो उत्सवप्रिय आहे.हा‌समाज दीड दीड वर्षे बांधून ठेवल्यावर काय परिणाम होतील याचा विचार करून निर्बंध लावणे गरजेचे आहे. दोन वर्षे वारी रद्द झाल्याने वारीला जायला न मिळालेल्या १५ लाख वाकऱ्यांना विचारा काय होते ते ? त्यांना काय जात मातोश्रीत बसुन आदेश काढायला, असे म्हणत पाटील‌ यांनी गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीचे समर्थन केले. नागरिकांनी मागील वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लोक मास्क लावून उत्सवासाठी बाहेर पडणारच, असेही‌ ते म्हणाले.

मुले वेडी होतील

सरकार निर्बंध घालून कारवाया करणार असेल, मुलांना जास्त गिवस शाळांपासून दूर ठेवणार असेल, तर मुले वेडी होतील. सरकारला हे करायचंच असेल तर खुशाल करावे, असेही पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love