सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी कुठं पाहिली नाही :टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत- राजेश टोपे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे—रुग्णालयाच्या सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिली नाही. अशा पद्धतीचं फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल तर तेही चुकीचं आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. रुग्णालयातील एमआरआय विभागात फोटो काढणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही, असं मत व्यक्त केलं.

टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत. काही कायदेशीर बाबी किंवा नियम असतात त्याचं पालन झालं पाहिजे. कोणी आजारी असेल तर ते सार्वजनिकपणे इतरांना सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीची तपासणी व्हायला हवी, आजारी असल्यास त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. मात्र, त्यात राजकारण करण्याचं काम करू नये. ही चुकीची पद्धत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान,  टोपेंनी कोरोनाची सध्यस्थितीबाबत बोलताना सांगितले की, सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे, ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्या राज्यातही रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी टोपेंनी दिली.

आरोग्य भरतीसंदर्भात विधानसभेत आश्वासन दिले आहे. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते, पोलिसांचा सविस्तर अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे, ‘’ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत, तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून त्यांचेही मत लक्षात घेतलं आहे, दोन्हीही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यात झाला आहे, अशी माहिती आरोग्यभरती बाबत राजेश टोपे यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *