पार्थ पवार म्हणतात सत्यमेव जयते


मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

पार्थ पवार यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्यावेळी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं. याविषयी शरद पवार म्हणाले की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे असे जाहीर वक्तव्य केलं होतं.

अधिक वाचा  #Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

पार्थ यांना यांना जाहीर फटकारल्यानंतर पार्थ आणि अजित पवार नाराज झाल्याचे बोलले जात आहे.त्यानंतर पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची बैठक रविवारी झाली असल्याचे समजले होते.  या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार असे सर्वजण उपस्थित होते. या संयुक्त चर्चेत पार्थची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात ही शनिवारी (१५ ऑगस्ट) रात्री ही बैठक झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर पार्थ यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात होते. परंतु पार्थ नी पुन्हा सर्वोच्च नयायालयाच्या  निर्णयावर ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केल्याने अजूनही काही अलबेल नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

अधिक वाचा  शरद पवार म्हणतात, 'नाथाभाऊ चीज क्या है,जान लीजिये....

शरद पवार यांचे दुसरे नातू आमदार रोहित पवार यांनी मात्र, यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ यांनी काय ट्वीट केले मला माहिती नाही, हा विषय न्यायालयात गेला होता त्यामुळे आता यावर काय निर्णय घ्यायचा हा सरकारचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love