राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘राज्यज्योती’ पुरस्कार देऊन सन्मान : स्टेप्स फाउंडेशन, स्टेप्स अकादमी, सुवर्णमेघ प्रोडक्शनचा पुढाकार 


पिंपरी(प्रतिनिधी) : स्टेप्स फाउंडेशन स्टेप्स अकादमी आणि सुवर्णमेघ प्रोडक्शन तर्फे आयोजित राज्यज्योती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. पंडित राठोड, सकाळ न्यूज नेटवर्कचे संदीप काळे, यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड, प्रा. विलास वाळके व प्रा. संदेश मुखेडकर, कल्पतरू प्रायव्हेट लि. चे डायरेक्टर संदीप मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रत्नाधाव फाउंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक चेतन बंडेवार, प्रीतम ग्रूप ऑफ कंपनीचे सीएमडी प्रितम गंजेवार, आरोग्य दूत भिमेश मुतुला यावेळी उपस्थित होते.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात क्रिष्ट युनिव्हर्सिटी लवासाचे सहाय्यक प्रा. पूनमकुमार हिंगे यांचा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार, इंद्रायणी महाविद्यालय तळेगावच्या अकाउंट विभागाच्या आशा शिंदे यांना उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार, ज्ञानसागर स्कूलच्या प्रकृती प्राण नदी रॉय यांना जीवनगौरव पुरस्कार, स्वामी समर्थ कॉलनी फिल्म इंडस्ट्रीजच्या संचालिका दीपाली जोशी आणि अपर्णा जोशी यांना लोक गौरव पुरस्कार, विश्व कल्याण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संचालिका नीलम मेहता यांना नारीरत्न पुरस्कार, विश्वकल्याण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या लक्ष्मी छाया पवार यांना आदर्श शिक्षण रत्न पुरस्कार, सी.एस. फर्मचे अश्विन सिंग यांना बेस्ट फर्म पुरस्कार, नेमबाजी रायफल शूटिंगचे राष्ट्रीय प्रशिक्षक अरुण पाडुळे यांना क्रीडारत्न पुरस्कार, अलार्ड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार, दिव्या परिवार सिद्धी फाउंडेशनचे ब्रँड अँबेसिडर इंद्रजीत भोसले शिवव्याख्याते, डॉ. ललित धोका यांना वैद्यकीय पुरस्कार, देविदास गिरमे यांना सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार, अक्षय केळकर यांना सामाजिक क्षेत्रासाठी पुरस्कार, अमित निकम यांना बेस्ट सीएमए पुरस्कार, अनिता सुळे यांना उत्कृष्ट प्राध्यापिका, गोरख पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  राज्यात महिला बचत गटाचे सर्वाधिक जाळे - संजय निरुपम

याबरोबरच माजी सैनिक मुकुंद घोलप यांना जीवन गौरव पुरस्कार, चंद्रशेखर गुरव व कृषी पदवीधर कौस्तुभ रणशूर यांना कृषी नवयंत्र सखा पुरस्कार, मनेष कुलकर्णी यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, इंदिरा कॉलेजच्या शीतल देशमुख यांना उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार, विद्यश्री म्युझिकल ग्रुपचे प्रशांत पाटोदेकर यांना युवा संगीतरत्न पुरस्कार, अनमोल शिंदे यांना बेस्ट सीए पुरस्कार, इंदिरा कॉलेजच्या योगिता सुतार यांना उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार, लाडाची कुल्फीचे डायरेक्टर राहुल पापळ यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, अमेठी बिजनेस ग्लोबल स्कूलचे एम. गोपाळा कृष्णा यांना उत्कृष्ट प्राध्यापक, शिवव्याख्याते प्रदीप कदम यांना लोकगौरव पुरस्कार, प्रवीण इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजचे प्रवीण शेलार यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार, मनी अकॅडमीचे हेड आकाश गोंदवले यांना अर्थक्रांती पुरस्कार, डॉ. विष्णू माने यांना समजभूषण पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार रुचिका भोंडवे व ऍड. आशिष कुलकर्णी, ऍड. ओंकार वांगीकर यांना उत्कृष्ट ऍडव्होकेट, केतकी देशपांडे व राजेश वाळके यांना बेस्ट मॅनेजमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच प्रसाद शेवडे यांना उत्कृष्ट संगीतकार, चिन्मय जोशी यांना उत्कृष्ट गायक, भक्ती मुखेडकर यांना उत्कृष्ट गीतकार, संपदा जोशी यांना उत्कृष्ट निवेदिका, जानवी पडवळ यांना उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार, समृद्धी कुबडे यांना उत्कृष्ट गायिका पुरस्कार, स्नेहल कुलकर्णी व प्रज्ञा भामरे यांना उत्कृष्ट गायिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर

 अश्विन गुडसूरकर, लितेश  घरडे, प्रसाद कुलकर्णी, व्यंकटेश सोमवंशी, अभिषेक लोखंडे या स्टेप्स अकादमीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रुचिका भोंडवे व प्रा. संतोष पाचपुते यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love