मतदारांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात- अजित पवार


पुणे -“निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात,” असं मत अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर हिमालयात जाईन, या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला पुन्हा सांगतो हे असं म्हटले, ते तसं म्हटले, निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात.”

“शेवटी यश एकाला मिळतं, दुसऱ्याला अपयश हे घ्यावंच लागतं. त्याप्रमाणे आमच्या महाविकासआघाडीला यश मिळालं आहे आणि भाजपाला अपयश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आणि कसं सांगितलं याच्या खोलात मला जायचं नाही. त्याची चर्चाही करायची नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  सत्तापक्षाच्या मनात पाप नसेल तर ‘आरक्षण ठरावावर’ विरोधकांना बोलावयास देऊन चर्चा का घडवली नाही? - गोपळदादा तिवारी

“ज्यावेळी पराभव होतो तेव्हा तीन पक्षाची आघाडी होती असं म्हटलं जात आहे. तीन पक्षांची आघाडी होती याबद्दल आम्ही काही म्हणतच नाही. महाविकासआघाडीने तीन पक्षांचा मिळून उमेदवार दिला होता. निवडणुकीत एक मताने निवडून आलं काय आणि लाख मतांनी निवडून आलं काय, शेवटी त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते,” असंही मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love