चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन- जयंत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे– ‘पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत.’ असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवाच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ‘हिमालयात जाईन’ या वक्तव्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं.

कोल्हापूर पोट निवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे. तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केल आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना ही चपराक मिळाली आहे. असं देखील यावेळी पाटील म्हणाले.’ कोल्हापूरकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोडून दिले आहे.पुण्यातील कोथरुड मतदारसंघही त्यांना लवकरच सोडावा लागेल इतकी प्रेम, आपुलकी येथील कार्यकर्त्यांत दिसून आल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी पत्रकारांशी लगावला.

आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही’ – राज्यात दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, आम्ही खंबीर आहोत. प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्ही देखील प्रभू रामांना मानतो. आमच्यातही हिंदुत्वाचा भाग आहे. परंतु, आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे आमच्यावर संस्कार आहेत. तसेच राज ठाकरे यांना ३०  वर्षे यांना हनुमान चालिसा आठवली नाही. भाजप जे सांगत आहेत. ते राज ठाकरे करत आहेत, अशी टीका देखील यावेळी जयंत पाटील यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘परिवार संवाद यात्रेत बोलताना ते म्हणाले, ज्या पध्दतीने जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात पुढील नियोजन असे आहे की,  राज ठाकरे एका बाजूने विषय उभा करुन आग्रह करत असून दुसऱ्या बाजूला लवकरच त्याला प्रतिवाद करण्यासाठी एमआयएमचे नेते ओवेसी यांची ही पिक्चरमध्ये एन्ट्री याप्रकरणात होईल.

राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा व त्यापुढे राज्यात काहीतरी अघटित करण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील जनतेला हळूहळू या गोष्टी दिसून येतील.पेट्रोल, डिझेल, गॅस, सिमेंट, स्टील याची महागाई प्रचंड वाढूनही त्याबाबतची चर्चा होताना दिसून येत नाही.  परंतु, हनुमान चालिसाची चर्चा होते. आम्ही ही हनुमानाचे, रामाचे भक्त आहे परंतु आम्ही त्याचे कधी प्रदर्शन करत नाही. हिंदु धर्माचा अभिमान असला तरी दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही पाहिजे. त्यामुळे जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेले नाही, ज्याचा सध्या वापर सुरु आहे.

ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित येतात त्यावेळी भाजपचा पराभव होणे फार अवघड नाही. त्यामुळे कोल्हापुरात आमचा विजय सुकर झाला. कोल्हापूर मधील विजय हा पुरोगामीपणाकडे कशाप्रकारे महाराष्ट्र झुकलेला आहे याची परिचिती देणारा आहे. शाहू-फुले-आंबेडकर  यांचे नाव आम्ही उगीच घेत नाही. शाहूंनी राज्यात समतेचा विचार दिला त्या करवीरनगरीने दिलेला निकाल राज्यासाठी आर्दश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मनात या पराभवाचे शल्य राहिल. पोटनिवडणुकीत उभे राहण्याची त्यांना संधी होती परंतु ते उभे राहिले नाही. ते हिमायलयात जाणार असतील तर मी त्यांच्या सोबत जाईल ते मी पसंद करेल, असे ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तोडण्याचे सर्व मार्ग वापरुन झाले आहे. आमदार फोडण्याचे प्रयत्न झाले, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, ईडी, आयटी, सीबीआय वापरुन झाले. त्यामुळे आता काय हा प्रश्न निर्माण झाला असून आता दंगल घडविण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. याद्वारे अशातंता निर्माण करणे व महाराष्ट्र अस्थिर आहे असे दाखवून राष्ट्रपती राजवट आणा अशाप्रकारचा घाट काहीजण घालत आहे.आमचे सरकार कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास समर्थ आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *