पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी; 28 तारखेपर्यंत शाळा बंद


पुणे- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (9 हजार 217) सक्रिय रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आणि महापालिका स्तरावर याबाबत काय उपाययोजना करता येतील, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या वाढल्यास काय तयारी करावी लागेल यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पुण्यातील कौन्सिल हॉल येथे झाली. त्यामध्ये कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. रात्री 11 ते सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा येत्या 28 फेब्रुवारी पर्यन्त बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच शहरातील रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. लग्न समारंभाला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा गर्दी होऊ लागली आहे तसेच यावेळी मास्क न वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे लग्नसमारंभासाठी 200 जणाची मर्यादा घालण्यात आली आहे.

अधिक वाचा  नोटबंदी, जीएसटी आणि टाळेबंदी ठरतेय महिला कामगारांच्या रोजगार दरातील घसरणीमध्ये महत्त्वाचा भाग

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुंबई,पुणे, ठाणे, अमरावती, अकोला, यवतमाळ,बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढते आहे. पुणे महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन क्युआरटी टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचारी असतील.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love