मुंबई- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम भव्य मंदिर उभारणीसाठी सध्या राममंदिर समर्पण निधी अभियान सुरू आहे. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीटवर टीका करत ‘हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबायला हवा .. असे म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ट्वीट करत समाचार घेतला आहे.
लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा, असे ट्वीट करीत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.