पुणे – महाराष्ट्रात घटनात्मक स्थापित महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करूनही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजपकडून आता ‘गुजरात व आसाम’या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी – विक्रीचा घाट’ घातला जात आहे’, असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. भाजपची ही ‘सत्ता लालसेची’ कुटील कारस्थाने निंदनीय असून, लोकशाही व नैतिक मुल्यांना तिलांजली देणारी आहेत अशी टिकाही तिवारी यांनी केली आहे.
”आपल्या मागे राष्ट्रीय पक्षाची महाशक्ती असुन, कोणत्याही बाबतीत काहीही कमी पडणार नसल्याचा दावा… एकनाथ शिंदे कशाच्या आधारे करतात”? हे त्यांचे विधानच या फोडाफोडी मागील भाजपची पडद्यामागील भूमिका स्पष्ट करणारी आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात आदी राज्यातील आमदारांच्या फोडाफोडीने भाजपने सत्ता हस्तगत केल्याची कामगीरी सर्वश्रुत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वात्र्यंतोतर भारतात लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी, भ्रष्ट नितीमुल्यांना व सत्तेच्या दलालांच्या संधीसाधू-पणास आळा घालण्यासाठीच् काँग्रेस नेते, तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला. स्वातंत्र्योत्तर भारताचे देशाचे ते पंतप्रधान कुठे आणि या लोकशाहीच्या नितीमुल्यांची पायमल्ली करणारे सद्यःचे भाषणजीवी पंतप्रधान कुठे अशी टिप्पणी करतानाच ‘लोकशाही मुल्ये व नैतिकतेच्या दृष्टिकोनात’ याची तुलनाच होऊ शकत नाही, असे देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.