आशियाना हाऊसिंग आणि लोहिया जैन ग्रुपच्या भागीदारीतून हिंजेवडीमध्ये उभारणार आशियाना मल्हार प्रकल्प

अर्थ पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : नवी दिल्लीमधील एनएसई आणि बीएसई सूचीबद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर आशियाना हाऊसिंग आणि पुण्यातील लोहिया जैन ग्रुपने पुण्याच्या हिंजवडी भागात आशियाना मल्हार हा प्रीमियम प्रकल्प साकारण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आशियाना मल्हार हा ११.३३ एकरवर पसरलेला प्रकल्प आशियाना हाउसिंगद्वारे विकसित केला जाईल. हा प्रकल्प एकूण ९९० निवासी युनिट्स देऊ करेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २२४ प्रशस्त युनिट्स असतील.

या प्रकल्पात दोन-बेडरूम आणि तीन बेडरूम अपार्टमेंट्स असतील आणि त्यात वापरण्यायोग्य चटई क्षेत्र ७३३ चौरस फूट ते १०४५ चौरस फूट असेल. प्रत्येक टॉवरमध्ये १४ मजले असतील आणि पुण्यातील ग्राहकांच्या गरजेनुसार स्टिल्ट आणि ओपन पार्किंग असेल. रहिवाशांना उत्तम राहणीमानाचा अनुभव मिळेल अशा प्रकारे आशियाना मल्हारचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई-बंगलोर महामार्गाशी उत्तम प्रकारे जोडल्या गेलेला हा प्रकल्प वर्किंग मिलेनियल्सच्या गरजा पूर्ण करेल – वर्क-सेंट्रिक स्मार्ट घरे, मोकळ्या आणि हिरव्यागार जागा, इन-हाऊस क्लबहाऊस इ. आशियाना मल्हार अशी जागा असेल जिथे कोणालाही घरासारखे वाटेल.

“आयटी कंपन्यांच्या शेजारी असण्याचा लाभ मिळत असल्याने दर्जेदार घरांसाठी नेहमीच पुण्यात मागणी वाढत  आहे अलीकडील “वर्क फ्रॉम होम” मॉडेलकडे वाढलेला ओढा आणि हायब्रिड वर्क कल्चरच्या गरजेमुळे वर्क-सेंट्रिक, स्मार्ट घरांची मागणी आहे. आशियाना मल्हार हा उद्देश योग्य पूर्ण करेल.”

हिंजवडी क्षेत्रासह शहरातील अनेक सूक्ष्म बाजारपेठांमध्ये अलिकडच्या वर्षांत भांडवली मूल्यात वाढ झाली आहे. विविध श्रेणींमध्ये निवासी पर्यायांचा सातत्याने पुरवठा आणि सुस्थापित पायाभूत सुविधांमुळे हे क्षेत्र गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. मागील दोन वर्षांमध्ये बाजारपेठेचे लक्ष अधिक वर्क आणि वेलनेस-केंद्रित स्मार्ट घरे बांधण्यावर केंद्रीत झाले आहे.

नवीन उभरत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला, आशियाना मल्हार प्रकल्प हा कार्यालये आणि घरांमध्ये काम करणार्याक हायब्रिड गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले, आशियाना मल्हार ठरेल. शिवाय यात  मोकळ्या आणि हिरव्यागार जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद घेण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त, या प्रकल्पाला पुण्यातील इतर प्रमुख भागांशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळालेला आहे. येथून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त ४५ मिनिटांच्या झिप ड्राइव्हवर आहे, तर रेल्वे स्थानक सुमारे ४० मिनिटांच्या अंतरावर आहे.

या शुभारंभप्रसंगी संबोधित करताना आशियाना हाऊसिंगचे जेएमडी अंकुर गुप्ता म्हणाले की “’आशियाना मल्हार ‘ लाँच करून आम्ही मेट्रो सिटी पुण्यामध्ये  आमचा ठसा आणि उपस्थिती वाढवत आहोत. आमचे ग्राहक, कर्मचारी आणि आम्ही ज्या समुदायांमध्ये काम करतो त्यांच्याशी आमची सामाजिकदृष्ट्या जागरूक ब्रँड म्हणून अटूट बांधिलकी आहे. आधुनिक राहणीमानाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही या अपार्टमेंट्सना आकार दिला आहे. आशियाना मल्हारमध्ये प्रत्येकाला अत्यावश्यक सेवांसह दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. तसेच उत्तम वातावरण-निर्मिती मिळेल. हा प्रकल्प एक सशक्त आणि अधिक काळजी घेणारा समुदाय तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

या प्रकल्पाच्या शुभारंभाबाबत बोलताना लोहिया जैन समूहाचे संचालक श्री. मदन जैन म्हणाले, “आमच्या प्रकल्पाच्या शुभारंभासोबतच  आमच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा प्रकल्प एक अद्वितीय ऑफर असेल आणि दोन ब्रँडच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करेल, अशी आम्हाला आशा आहे. ही ऑफर या भागातील विवेकी घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना भविष्यकालीनप्रीमियम राहणीमानासह सेवा देईल. हे पुण्याची बाजारपेठ परिपक्व झाल्याचे द्योतक आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *