#Amit Thackeray :‘बहिरोंको सुनाने के लीए धमाकेकी जरूरत है..’ – अमित ठाकरे

Bangs are needed to hear the ears
Bangs are needed to hear the ears

Amit Thackeray : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(Savitribai Phule Pune University) मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या (Pune ) व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) म.न.वि.सेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली मूक मोर्चा(silent march) काढण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात जर येत्या आठ दिवसांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा अमित ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला. (Bangs are needed to hear the ears)

अधिक वाचा  गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन : विसर्जन सोहळ्याचे व्हिडिओ बघा

या मोर्चात शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते गजानन काळे, मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यासह विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू शरद गोसावी यांना अमित ठाकरे यांनी दिले.त्यावेळी त्यांची जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर  त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद  साधला.

अमित ठाकरे म्हणाले, या मोर्चाची दखल कुलगुरू शरद गोसावी यांनी घेतली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आज मोर्चा काढला आहे. जर येत्या आठ दिवसांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ.

ते पुढे म्हणाले, सावित्री बाई पुणे विद्यापीठाची स्थापना १९५० मध्ये झाली.जवळपास ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तेव्हापासून मेसमध्ये चांगल्या प्रकारचे जेवण मिळत नाही, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत  मात्र,  त्यामध्ये विद्यापीठ प्रशासन सुधारणा करीत नाही, याबाबत खंत वाटते. तसेच जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना राहण्याची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नाही. त्याकरिता वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, यासह अनेक मागण्या केल्या आहेत. त्यावर कुलगुरू यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा कुलगुरू आणि एकंदरीत प्रशासनाकडून ठेवली आहे. राज्यात आणि पुणे शहरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे आम्ही आजचा मोर्चा शांततेत काढला आहे.

अधिक वाचा  पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू:मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

माझ्या राजकीय पहिल्या केसची वाट बघतोय

मी राजकीय जीवनात आल्यापासून माझ्या राजकीय पहिल्या केसची वाट बघतोय आणि ती केस पुण्यामधून मिळाल्यावर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.  आम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाला  आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, अशी भूमिका मांडत विद्यापीठ प्रशासनाला त्यांनी इशारा दिला .‘बहिरोंको सुनानेके लीए धमाकेकी जरूरत है… असं आजच आंदोलन होतं असेही ते म्हणाले.

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, पुणे शहरात ड्रग्सचे प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. तर पुणे पोलिसांनी जवळपास ४ हजार कोटींच्या रकमेचे ड्रग्स जप्त केले आहेत. याहीपेक्षा अधिक रक्कमेच ड्रग्स असू शकते. त्यामुळे या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज असून गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love