अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; शासकीय तंत्रनिकेतनात पंतप्रधानांचा फोटो काढल्याने पुण्यात खळबळ

अमित ठाकरे शासकीय तंत्रनिकेतन पुणे गुन्हा दाखल
अमित ठाकरे शासकीय तंत्रनिकेतन पुणे गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधी)–पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संपर्क मोहिमेदरम्यान मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात धाव घेतली. पण, त्याआधीच कॉलेज प्रशासनाकडून हा फोटो पुन्हा लावण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह 20 ते 25 पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी या महाविद्यालयात पोहोचले होते. या वेळी प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तीव्र आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांच्या शेजारी देशाच्या पंतप्रधानांचे छायाचित्र कशासाठी, असा संतप्त सवाल अमित ठाकरे यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्राचार्यांना विचारला. यानंतर अमित ठाकरे यांनी तात्काळ तो फोटो तेथून काढण्याचे आदेश दिले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पंतप्रधानांचे छायाचित्र भिंतीवरून काढून घेतले. त्यानंतर कार्यालयात 2ज़य शिवाजी, जय भवानी’ आणि ’हर हर महादेव’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

अधिक वाचा  माऊली, तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन..

याच दौऱ्यादरम्यान महाविद्यालयाच्या पॅन्टीनमध्ये अमित ठाकरे यांनी तेथे थेट धाड टाकली. महाविद्यालयाच्या पॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या आणि क्रीडा विभागासाठी प्रशिक्षक (कोचेस) नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी अमित ठाकरेंकडे केलेल्या होत्या. अमित ठाकरेंनी पॅन्टीनची पाहणी केली असता तेथे चक्क सडलेले कांदे आढळून आले. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सडलेल्या कांद्यांचा व्रेट थेट प्राचार्यांच्या टेबलवर आणून आपटला. पॅन्टीनमधील अन्न आणि स्वच्छतेची परिस्थिती सुधारली नाही, तर हेच खराब अन्न आम्ही तुम्हाला खायला घालू, अशा अत्यंत कडक शब्दांत अमित ठाकरेंनी प्राचार्यांना दरडावले आणि इशारा दिला.

मनसेच्या कृत्याचा भाजपकडून निषेध

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर भाजपचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अमित ठाकरेंच्या या कृतीला ‘राजकीय अज्ञान’ आणि ‘अपरिपक्वता’ असे संबोधत या कृत्याचा निषेध केला. शासकीय नियमांनुसार आणि राजशिष्टाचारानुसार देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे छायाचित्र सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावणे बंधनकारक असते आणि हा फोटो कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा नसून देशाच्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचा असतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे बिडकर यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीकडून समर्थन

दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनी मात्र अमित ठाकरेंच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त विश्वाचे आराध्य दैवत असून त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. शासकीय कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो लावण्यास आमचा आक्षेप नाही, परंतु तो शिवरायांच्या बरोबर लावणे अत्यंत चुकीचे असून, या चुकीबद्दल महाविद्यालयाने आणि राज्य सरकारने शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी केली.

अधिक वाचा  डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेडिंग पॅटर्नमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ: ९० दिवसांत ३६४२ ट्रेड्स आणि ‘इन्सायडर ट्रेडिंग’चा संशय

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही अमित ठाकरेंच्या या कृतीचे अभिनंदन केले आणि महापुऊषांचे स्थान नेहमीच सर्वोच्च राहिले पाहिजे, असे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते अमोल मातेले यांनीही या कृतीचे समर्थन करत 2014 पासून भाजप जाणीवपूर्वक पंतप्रधानांची तुलना महापुऊषांशी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

या प्रकारानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात धाव घेतली. पण, त्याआधीच कॉलेज प्रशासनाकडून हा फोटा पुन्हा लावण्यात आला. दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथील कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून नेल्याचा तसेच अधिकाऱ्यांना धमकावून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह 20 ते 25 पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी दुपारी साडेबारा ते सव्वाएकच्या दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथे घडला. याबाबत डॉ.राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तंत्रनिकेतन परिसरात आले होते. तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधितांनी विनापरवाना बेकायदेशीर जमाव जमवून महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. कार्यालयात काही काळ थांबून जोरजोरात घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

अधिक वाचा  राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अमित राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 20 ते 25 अनोळखी पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील 2023 मधील कलम 329(3), 189(1), 46, 223 आणि 34(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 120 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेमागील नेमका वाद काय होता, कार्यालयात प्रवेश करण्यामागचे कारण काय होते आणि पंतप्रधानांचा फोटो काढून नेण्याच्या आरोपाची पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास चतु:शृंगी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे पुण्यात राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love